ठाणे : Investors Cheating in Bhivandiभिवंडीत एका कंपनीच्या मालकासह मॅनेजरने एका व्यापाऱ्याला गुंतवणूकीतून अधिक परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केलीय. मूळ रकमेवर ११ ते १२ टक्के नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्या व्यापाऱ्याला सुमारे ३१ कोटी रुपयांचा चुना लावल्याची घटना घडलीयं. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात चुना लावणाऱ्या मालकांसह मॅनेजरवर विविध कलमानुसार फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. मालक पराग पंकज ठक्कर (४४ रा.मुलुंड पश्चिम) व मॅनेजर, सागर शंकरन चिनारामपेल्ली (४५ रा.विरार पश्चिम) असा ३१ कोटींचा अपहार करणाऱ्या भामट्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पराग ठक्कर यांच्या मालकीची इंडो पॅसिफिक ग्लोबल सर्व्हिसेस नावाने भिवंडीत कंपनी आहे. या कंपनीत आरोपी सागर हा मॅनेजर पदावर कार्यरत आहे. या दोघांनी आपसात संगनमत करून भिवंडीतील कामतघर परिसरातील गणेश नगरमधील वऱ्हाळदेवी अपार्टमेंटच्या ए २१ मध्ये राहणारे संदीपकुमार भगवानदास गुप्ता यांना इंडो पॅसिफिक ग्लोबल सर्व्हिसेस या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास १२ टक्के नफा मिळून देऊ असे आमिष दाखविलं होतं.
३१ कोटी रुपयांचा अपहार करून फसवणूक -रकमेवर महिन्याला ११ ते १२ टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविलं. या आमिषाला बळी पडून जानेवारी २०२२ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत गुप्ता यांनी आरोपींच्या कंपनीत ३१ कोटी ९५ लाख २७ हजार ३०० रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर दोघा भामट्यांनी चालाखी करत रकमेची नोटरी करून गुप्ता या व्यापाऱ्याला प्रॉमिसरी नोट केली. त्या रकमेचे गोठवलेल्या इंडलसंड बँक खात्याचे ४२ चेक दिले. मात्र गुंतवणूक करूनही त्यापासून नफा मिळणारी रक्कम दोन्ही आरोपींनी दिली नाही. त्यानंतर व्यापाऱ्यांना ३१ कोटी रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे लक्षात आले.
व्यापारी वर्गात खळबळ-याप्रकरणी फसवणूक झालेले व्यापारी संदीपकुमार यांनी ३१ ऑगस्ट रोजी नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर व्यापाऱ्याच्या तक्रानुसार कंपनी मालक व मॅनेजर यांच्यावर भादवि कलम ४२०,४०६,३४ न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद कुंभार करीत आहेत. तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. Thane crime
हेही वाचा-
- Little Girl Locked In House : चिमुकलीला घरात कोंडून ठेवणाऱ्या दाम्पत्यापैकी एकाला नागपूर विमानतळावरून अटक
- Sudhir More Dead Body Found In Mumbai : उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; सुधीर मोरे यांची रेल्वेपुढं आत्महत्या?