महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तपास यंत्रणा केंद्राच्या तालावर नाचत आहेत - उद्धव ठाकरे

तपास यंत्रणा केंद्राच्या तालावर नाचत आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत तुरुंगाबाहेर आल्याचा आनंद आहे असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

By

Published : Nov 10, 2022, 1:28 PM IST

Updated : Nov 10, 2022, 2:07 PM IST

मुंबई - तपास यंत्रणा केंद्राच्या तालावर नाचत आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री ( Uddhav Thackeray on ED probe ) उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत तुरुंगाबाहेर आल्याचा आनंद आहे असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, की नेहमीच अरेतूरे बोलतोय कारण आम्ही चांगले जिवलग मित्र आहोत. केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यासारख्या वागत आहेत. संपूर्ण देश हे सगळं बघत आहे. न्यायदेवता आपल्या अंकित करण्याची सुरुवात केंद्र सरकार करते की काय अशी भीती आहे. सर्वसामान्यांच्या आशेचा किरण न्यायालय असते. आणि न्यायालय आपल्या आधी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असेल तर सगळ्यांनी विरोध करायला हवा. आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले. जे पळून गेले त्यांना संजय राऊत यांचा चांगला धडा आहे. संजय राऊत आमची लांब पल्याची तोफ आहे. संजय राऊत आणि अटक झाल्यानंतर मी भावूक होतो. न डरता आपण कसं लढू शकतो जिंकू शकतो हे संजय राऊत आणि दाखवून दिले आणि हे उदाहरण देशापुढे उभे केले आहे

शिवसेना हा परिवार आहे-संजय राऊत ( Sanjay Raut in press ) म्हणाले, की मला खात्री होती ठाकरे कुटुंब माझ्या कुटुंबाची काळजी घेईल. आमच्या शिवसेनेसाठी मला दहा वेळा तरी तुरुंगात टाकले तरी जायला तयार आहे. पक्षाशी बेईमान करणे आणि पक्षाला मी आई म्हणतो त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची माझी वृत्ती नाही. शिवसेना एकच आहे गट वगैरे काही नाहीत.

शिवसेना खरी उद्धव ठाकरेंची आहे. तुरुंगातील अनेक समस्या आहेत कर्मचारी आहेत. त्यांचे प्रश्न मी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार ते गृहमंत्री आहेत. राज्य फडणवीस चालवतात बाकीचे गुंडाळतात. आमच्यासारख्यांना बेकायदेशीर अटक होणे ही राज्यघटना गोठवण्याचा प्रकार आहे

Last Updated : Nov 10, 2022, 2:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details