मुंबई:मागील २५ वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची सत्ता होती. त्यामुळे हा त्यांचाच भ्रष्टाचार असल्याचा आरोप होत आहे; परंतु हा अहवाल उघडकीस आल्यावर याबाबत आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आमदार आदित्य ठाकरे शिंदे शासनाला टोला लगावत म्हणाले की, मागील एक वर्षापासून मुंबई सहित २४ महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका झाल्या नाही. हे 'सीएम' म्हणजे 'करप्ट मॅन' असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. अशा 'करप्ट मॅन'कडून काय अपेक्षा केल्या जाऊ शकतात? हे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुंबईला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे. मुंबईच्या संस्था दुसऱ्या राज्यात न्यायच्या, मुंबईचा पैसा दिल्लीला पोहोचवायचा ही सर्व यांची षड्यंत्र असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आम्हाला आमची कामे माहीत आहेत. म्हणून जनतेने आम्हाला २५ वर्षे निवडून दिले, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणले: आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, त्यांनी भ्रष्टाचाराची चौकशी करावी; पण त्यादरम्यान नगर विकास मंत्री कोण होते? आयुक्त कोण होते? हेसुद्धा लक्षात घ्यावे. मुंबई महानगरपालिकेमधील सॅनिटरी नॅपकिन, फर्निचर घोटाला आम्ही बाहेर काढला असे सांगत, 'लोग काटों से बच बच कर चलते है, हमने तो फूलों से भी जख्म खाये है', असे म्हणत त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर एक उपहासात्मक टोला लगावला आहे.