मुंबई : भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला डी कंपनीचा मालक दाऊद इब्राहिमविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. त्याचा सुगावा अद्याप लागलेला नाही. तो पाकिस्तानातील कराची येथे असल्याची केवळ चर्चाच केली जाते. अनेकदा असे दिसून येते की, गुन्हेगाराने ज्या देशात गुन्हा केला आहे, तो देश सोडून आरोपी इतर देशांत जातो. अशा परिस्थितीत, त्या देशांना फरार गुन्हेगारांचा शोध आणि सुगावा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पोलिसांची मदत घेणे अत्यावश्यक असते.
रेड कॉर्नर नोटीस : दाऊद इब्राहिम 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित असल्याने भारत सरकारच्या विनंतीवरून त्याच्याविरुद्ध रेड नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पोलिसांना रेड कॉर्नर नोटीसद्वारे हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. जर एखाद्या गुन्हेगाराला इंटरपोल सदस्य देशाच्या पोलिसांनी पकडले असेल. त्यानंतर त्याने गुन्हा केलेल्या देशात प्रत्यार्पण केले जाते. कर्ज बुडवणारा आरोपी विजय मल्ल्या, अभिनेत्री ममता कुलकर्णी, ललित मोदी, झाकीर नाईक आणि दाऊद इब्राहिम यांसारख्या वाँटेड व्यक्तींविरुद्ध भारताने इंटरपोलकडे रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.
जन्मठेपेची शिक्षा :कुख्यात गुंड अबू सालेम हा चित्रपट निर्मात्यांकडून पैसे उकळण्यासाठी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये कुप्रसिद्ध होता. बॉलीवूड चित्रपट निर्माते गुलशन कुमार, सुभाष घई, राजीव राय आणि राकेश रोशन यांना धमकावण्यामागे सालेमचा मास्टरमाईंड होता, असे मानले जाते. त्याच्या टोळीतील सदस्यांनी 1997मध्ये गुलशन कुमार यांची हत्या केली होती. सुदैवाने राजीव राय आणि राकेश रोशन यांच्या हत्येचा त्यांचा प्रयत्न फसला होता. अनेक खून आणि खंडणीसह इतर गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग होता. त्याला 2002 मध्ये पोर्तुगालमध्ये बनावट पासपोर्ट वापरल्याबद्दल सालेमला अटक करण्यात आली. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीनंतर त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. त्याच्यावर खटला चालवला गेला. काही प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले. 2015 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.