मुंबई Internet Users In Maharashtra : 14 नोव्हेंबर हा दिवस देशभरात बालदिन (Childrens Day) म्हणून साजरा केला जातो. मात्र अलीकडं लहान मुलांमध्ये संगणकाचा आणि इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होतं असल्यानं बाल सुरक्षा सप्ताह सुरू होत आहे. लहान मुलांसाठी राज्यभर ऑनलाईन सुरक्षा उपक्रम क्राय या संस्थेनं सुरू केला आहे. बाल हक्क आणि बालकांची सुरक्षितता याच्याशी निगडित समस्यांबाबत मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 'सायबर सुरक्षितता अभियान' राबवलं जात आहे. आतापर्यंत मुंबईतील वीस हजार शालेय मुलांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी जागरूकता अभियान: क्राय या संस्थेनं राज्यभरातील शाळांना भेटी देऊन, पाचवी ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं कार्यशाळा घेतली. फिशिंग सायबर छळ ओळख, खोट्या जाहिराती, सायबर ट्रॅफिकिंग आणि ऑनलाइन गेमिंग याबाबत मुलांना शिक्षण देण्यात आलं. ऑनलाइन फोनचे पासवर्ड सुरक्षित कसे ठेवावे स्मार्टफोनचं संरक्षण कसं करावं, सोशल मीडिया खात्यांवर खासगी माहिती शेअर करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत या विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यात आल्याचं क्रिया रबाडी यांनी सांगितलं.