महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसामुळे एमटीएनलची इंटरनेट सेवा ठप्प, मेट्रोच्या कामांचाही फटका - Government Office

एमटीएनएल या सरकारी कंपनीचे इंटरनेट आणि फोन सुविधा ठप्प झाली आहे. यामुळे सीएसएमटी परिसरात असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालयासह अनेक कार्यालयांना याचा फटका बसला आहे. मेट्रोकडून खोदकाम करताना केबल तुटल्याचा फटका देखील एमटीएनएलला बसला आहे.

पावसाने एमटीएनल कंपनीचे इंटरनेट बंद

By

Published : Jul 8, 2019, 3:18 PM IST

Updated : Jul 8, 2019, 5:01 PM IST

मुंबई- शहरात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शहरातील एमटीएनएल या सरकारी कंपनीचे इंटरनेट आणि फोन सुविधा ठप्प झाली. याचा फटका सीएसएमटी परिसरात असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालयासह अनेक कार्यालयांना बसला. मेट्रोने सीएसएमटी परिसरात खोदकाम करताना केबल्स तोडल्या. यामुळे सेवा बंद असून त्यासाठी एमटीएनएल मेट्रोला नोटीस बजावणार असल्याचे समजते.

पावसाने एमटीएनल कंपनीचे इंटरनेट बंद


मुंबईत केंद्र सरकारच्या एमटीएनएल या सरकारी कंपनीकडून फोन सुविधा पुरवली जाते. सरकारी कार्यालयांमध्ये आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात आजही एमटीएनएलचे फोन वापरले जातात. तसेच सरकारी कार्यालयांमध्ये एमटीएनएलचे इंटरनेट वापरले जाते. मात्र आज पावसामुळे एमटीएनएलची फोन आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे.

(सीएसएमटी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विभागात आज सकाळपासून एमटीएनएलची सेवा बंद आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या कार्यालयातील येणारे फोन बंद झाले आहेत. तसेच इंटरनेट सेवाही बंद झाली आहे. त्यामुळे आज पालिकेच्या कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे. अशीच परिस्थिती या परिसरातील दुसऱ्या कार्यालयांची देखील झाली आहे. फोन आणि इंटरनेट सेवा बंद पडल्याने या विभागातील फोनची खण खण बंद झाली आहे. याविभागात इतरही इंटरनेट सेवांवर परिणाम झाला आहे.

Last Updated : Jul 8, 2019, 5:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details