महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'योग' महाराष्ट्राचा... - योगा दिन

आज जागतिक योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या महाराष्ट्रातदेखील उत्साह मोठ्या प्रमाणात दिसत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये योगगुरु रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत योगाअभ्यास केला. त्याचप्रमाणे राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये योग शिबीर घेऊन योगाचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. या निमित्ताने लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्धांनीसुद्धा योगा करत हा दिवस साजरा केला.

'योग' महाराष्ट्राचा...

By

Published : Jun 21, 2019, 2:39 PM IST

मुंबई- भारतीय नौदल अधिकाऱ्यांनीदेखील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने करत योग दिन साजरा केला. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे.म्हणूनच संयुक्त राष्ट्र एकत्र २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करतात त्यातच आज मुंबईत भारतीय नौदलाच्या सैनिकांनीदेखील योगा करत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

'योग' महाराष्ट्राचा...

वर्धा- जिल्ह्यात आज योगा दिनानिमित्त जिल्हा प्रशासन तसेच पतंजली योग समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा ते आठ दोन तास योग अभ्यासाचे धडे देत आणि योग केल्याने आरोग्याचे स्वस्थ आयुष्य जगण्याचा मार्ग सांगण्यात आला. यावेळी आमदार पंकज भोयर यांनी उस्थित राहून योगा केला.

'योग' महाराष्ट्राचा...

नाशिक- जिल्ह्यात जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटी येथे एनसीसीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विविध योगासने करत, 5 वा जागतिक योग दिन साजरा केला. सेवन महाराष्ट्र बटालियन यांच्यावतीने जागतिक योग दिनानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात एकूण 840 एनसीसीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

'योग' महाराष्ट्राचा...

जळगाव- जिल्ह्यासह शहरात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा आणि महाविद्यालयांनी एकत्र येत योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सर्वत्र योग दिनाचा चांगला उत्साह दिसून आला. शहरात छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा आणि महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. शासकीय सेवेततील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांनी स्वेच्छेने कार्यक्रमात सहभागी होऊन सामूहिकरित्या विविध आसने, प्राणायम करत योग दिवस साजरा केला.

'योग' महाराष्ट्राचा...

परभणी- याग दिनानिमित्ताने भल्या पहाटे उठून नागरिक योगासने करत आहेत. परभणीच्या कृषी विद्यापीठातदेखील कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्यासह तब्बल चार हजार प्राध्यापक, संशोधक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी योगासने केली. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सामूहिक योगासन करण्यात आली. कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आज सकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले होते.

'योग' महाराष्ट्राचा...

धुले- जगात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. धुळे शहरातदेखील जागतिक योग दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर सामूहिक योगाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला विद्यमान खासदारांसह अन्य लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. यावेळी शहरातील विविध मान्यवर आणि विविध शाळांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दांडी मारली होती.

'योग' महाराष्ट्राचा...

यवतमाळ- आंतरराष्ट्रीय योग दिन हॅलीपॅड ग्राऊंड (पोलिस कवायत मैदान) येथे आयोजित करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने यवतमाळच्या हॅलिपॅड मैदानावर सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हींग केंद्र, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने योगासनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात यवतमाळकरांनी सहभागी होऊन योग केले.

'योग' महाराष्ट्राचा...

जालना- शहरासह जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आज पहाटे योग शिबीर आयोजित करून योग दिवस साजरा करण्यात आला. पतंजली योग समितीच्यावतीने जुना जालना भागातील अनया गार्डन आणि नवीन जालना भागातील ज्वाला लॉन्स येथे हे योग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जालना शहरातील जेईएस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि एनसीसीच्या माध्यमातूनही विद्यार्थी, शिक्षकांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अनया गार्डन येथे आयोजित योग वर्गाला राज्याचे पशु संवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही हजेरी लावली.

'योग' महाराष्ट्राचा...

उस्मानाबाद- शहरातील पोलीस मुख्यालय येथील परेड मैदानात जिल्हास्तरीय मुख्य जागतिक योग दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सकाळी सहा वाजता सुरू झालेला योग साधना शिबिराचा कार्यक्रम 45 मिनिटे चालला. योग दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्यासोबत इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग त्याचबरोबर शहरातील सामान्य नागरिक, लहान मुलांसह वृद्धांनी या योग साधना शिबिरात सहभाग घेतला. पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिविंग, प्रजापती ब्रह्मकुमारी, भारत स्काऊट गाईड, रोटरी क्लब, जिल्हा विधीज्ञ, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी या योग शिबिराचे आयोजन केले होते.

'योग' महाराष्ट्राचा...

अमरावती- जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित योगासन प्रात्यक्षिक कार्यक्रमाला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्यांपासून जिल्हाधिकऱ्यांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिक या योग सोहळ्यात सहभागी झाले होते. शहरात एकूण 16 ठिकाणी योग प्रत्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.

'योग' महाराष्ट्राचा...

ABOUT THE AUTHOR

...view details