मुंबई -जागतिक महिला दिनाच्या दिवशी सर्वच पक्षाच्या महिला आमदारांनी एकमेकींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ( Womens Day Celebration in Budget Session ) या दिवसाचे औचित्य साधून महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधान भवन परिसरात महिला आमदार तसेच पत्रकार महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde on Womens Day ) यांनी कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांचा सत्कार करत त्यांना देखील जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोना काळात आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून महिला पोलिसांनी समाजासाठी मोठं काम केलं. असेल त्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाची महिला पोलिसांकडून मदत झाली, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. विधान भवन परिसरामध्ये महिला पोलिस कर्तव्य बजावत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी या सर्व महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा अभिनंदन केलं तर सोबतच महिला पत्रकारांना देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.