मुंबई-मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी खेळाडूंना सराव करण्यासाठी मरीन ड्राईव्ह येथील क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशानाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने मरीन ड्राईव्ह येथील क्रीडा संकुल अद्यावत करण्यात येणार आहे. यासाठी 36 कोटी 25 लाख रुपयांचा प्रस्ताव विद्यापीठाने तयार केला आहे.
क्रीडा संकुलाबद्दल होत्या तक्रारी
मुंबई विद्यापीठाच्या मरीन ड्राईव्ह येथील क्रीडा संकुलाची दुरवस्था असल्याने विद्यार्थ्यांचा त्यांचा वापर करता येत नव्हता. विद्यार्थांना सरावाला संकुल उपलब्ध होत नसल्याने त्याची मोठी प्रमाणात गैरसोय होत होती. विद्यार्थ्यांनी अनेकदा या सबंधित तक्रारीही केल्या होत्या.त्यानंतर आता मुंबई विद्यापीठाने मरिन ड्राईव्ह येथील क्रीडा संकुलन अद्यावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत
हेही वाचा-Live Updates : वाझे-मनसुख प्रकरणाला राजकीय वळण; मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'वर बैठक सुरू
36.25 कोटींचा प्रस्ताव-
मुंबई विद्यापीठाच्या मरीन ड्राईव्ह येथील क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम, बास्केटबॉल स्टेडियम, ऑलिम्पिक दर्जाच्या धावण्याचा ट्रॅक या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 36 कोटी 25 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती विद्यापीठाने आपल्या अधीसभेमध्ये दिली. त्यावर अधिसभा सदस्य नीलम हेळेकर यांनी संकलनाचा विकास म्हणजे नेमके काय करण्यात येणार आहे असा प्रश्न विचारला असता प्र-कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी संकलनाचे नूतनीकरण ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले आहे.
स्टेडियमची क्षमता 10 हजार-
मुंबई विद्यापीठाच्या मरीन ड्राईव्ह येथील क्रीडा संकुल अद्यावत करण्याच्या कमासाठी टाटा संस्थेने पुढाकार घेतलेला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ शकतील असा 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेचा ट्रॅक, फुटबॉल, बास्केटबॉल, स्टेडियम उभारण्यात येणार आहे. तसेच 10 हजार लोक बसू शकतील असे स्टेडियमही बांधण्यात येणार आहे. बॅडमिंटन कोर्ट, लांब उडी, उंच उडी, अशा विविध क्रीडा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
विद्यार्थ्यांना प्राधान्य
यासर्व सुविधा अद्ययावत व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उभारण्यात येणार असल्याचे प्राध्यापक कुलकर्णी यांनी सांगितले. याशिवाय बॉक्सिंग, रेसलिंग ज्यूडो, हँडबॉलची सुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यापीठ तसेच विद्यापीठाची सलग कॉलेजातील विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ प्राधान्य देण्यात येईल, असे प्राध्यापक कुलकर्णी यांनी सांगितले.
हेही वाचा-गृहमंत्रीपदी अनिल देशमुखच, कोणाचेही खातेबदल नाही - जयंत पाटील