मुंबई :खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने काढलेला अजामीनपात्र वॉरंट (Nonbailable warrant against Navneet Rana) कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही असे सरकारी वकिलांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सांगितल्यानंतर न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नवनीत राणा यांना तात्पुरता दिलासा (Interim relief to MP Navneet Rana) दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील सुनावणीपर्यंत 19 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या विरोधात अजामानीपत्र वॉरंट बजावण्यात येणार नाही. राज्य सरकारतर्फे सरकारी वकिलांनी कोर्टात तशी हमी दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Navneet Rana in caste verification case
नवनीत कौर राणा यांनी मांडली बाजू -बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलिसात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी शिवडी न्यायालयाने नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची कारवाई केली होती. परंतु हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना दंडाधिकारी न्यायालयाला अशाप्रकारे वॉरंट बजावण्याचे अधिकार नाहीत, अशी तक्रार नवनीत कौर राणा यांच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात करण्यात आली.