मुंबई : आयएनएस विक्रांत ही भारतातील पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. या विमानवाहू युद्धनौकेचे वजन सुमारे 45 हजार टन असून ते तयार करण्यासाठी सुमारे 20 हजार कोटी रुपये खर्च आला आहे. आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेची लांबी 262 मीटर आणि रुंदी 62 मीटर आहे. ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी युद्धनौका आहे. मिग-29 आणि हेलिकॉप्टरसह, त्यात एकावेळी 30 विमाने उभी राहू शकतात. या युद्धनौकेची क्षमता 1600 लोकांची आहे. आयएनएस विक्रांतमध्ये सुरुवातीला मिग लढाऊ विमाने आणि काही हेलिकॉप्टर असतील. नौदला 26 डेक-आधारित विमाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे.
सागरी टप्पे पूर्ण :आयएनएस विक्रांत बनवण्यासाठी दशकाहून अधिक काळ काम सुरू होते. गेल्या वर्षी 21 ऑगस्टपासून त्याचे अनेक सागरी टप्पे पूर्ण झाले. आता त्यात विमानचाचणी केली जाणार आहे. आत्तापर्यंत भारताकडे फक्त एकच विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य होती, जी रशियात बांधली गेली होती. हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरात दोन प्रमुख नौदल आघाड्यांवर तैनात करण्यात यावेच म्हणून तीन विमानवाहू नौकेची भारतीय संरक्षण दलांची मागणी होती.
नवीन आयएनएस विक्रांत मोठी आणि आधुनिक :आयएनएस विक्रांत युद्धनौका यापूर्वी भारतीय नौदलात आहे. एचएमएस हरक्यूलिस नावाची युद्धनौका भारताने 1957 मध्ये ब्रिटनकडून खरेदी केली होती आणि त्यानंतर 1961 मध्ये आयएनएस विक्रांत या नावाने भारतीय नौदलात सामील करण्यात आली होती. आयएनएस विक्रांतने 1971 च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यानंतर 1997 मध्ये ही युद्धनौका निवृत्त करण्यात आली. नवीन आयएनएस विक्रांत हि जुन्यापेक्षा अधिक मोठी आणि आधुनिक आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होऊन, आयएनएस विक्रांत देशाला एक महत्त्वाची अतिरिक्त युद्धनौका ठेरण्याची संधी देते, म्हणजेच आता एक विमानवाहू नौका पूर्व आणि पश्चिम दोन्ही किनारपट्टीवर तैनात केली जाऊ शकते आणि आपली सागरी गस्त वाढवते.