मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्यालाटेने भारतात थैमान घातले असून यामुळे दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. यातच भारताला परदेशातून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय मदत पाठवली जात आहे. याचाच भाग म्हणून फ्रान्स या देशाकडून भारताला 40 टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.
भारतीय युद्धनौकेने कतार बंदरहून आणले 40 टन लिक्विड ऑक्सिजन, फ्रान्सने केली मदत
कतार बंदर येथून भारतीय नौदलाच्या आयएनएस त्रिकांड या युद्धनौकेने आपत्कालीन परिस्थितीत जाऊन प्रत्येकी 20 टन वजनाचे 2 लिक्विड क्रायोजेनिक टँक घेऊन मुंबईत दाखल झाली आहेत.
त्रिकांड
कतार बंदर येथून भारतीय नौदलाच्या आयएनएस त्रिकांड या युद्धनौकेने आपत्कालीन परिस्थितीत जाऊन प्रत्येकी 20 टन वजनाचे 2 लिक्विड क्रायोजेनिक टँक घेऊन मुंबईत दाखल झाली आहेत. 5 मे रोजी कतारमधील बंदरात दाखल झालेल्या भारतीय नौदलाकडून अल्पकाळातच हे दोन्ही लिक्विड ऑक्सिजन क्रायोजेनिक टँक भारतात आणण्यात आले असून त्याचा पुरवठा मुंबईला झालेला आहे.
हेही वाचा -'पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन तातडीने लसीकरण करावे'