मुंबई:शरद पवार यांच्या घरा समोर झालेले आंदोलन पूर्वनियोजित होते पत्रकारांना यासंदर्भात पहिले माहिती मिळाली होती मात्र गुप्तचर यंत्रणेला माहिती मिळू शकली नव्हती सुरक्षिततेच्या त्रुटीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, (Home Minister Dilip Walse-Patil) पोलीस आयुक्त संजय पांडे, (CP Sanjay Pandey) मुंबई पोलीस उपायुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे-पाटील यांची तातडीची बैठक घेतली या बैठकीत या सर्व बाबींवर चर्चा केल्यानंतर समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
विश्वास नागरे पाटील यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती या सर्व प्रकरणाचा तपास करून अहवाल गृहमंत्र्यांना देणार आहे. पवार कुटुंबीय तसेच सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. खा. सुळे यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या पीएसयूवर असेल. मुंबई पोलिसांचे एक वाहन आणि दोन अधिकारी त्यांच्या सुरक्षेत तैनात असतील. सिल्व्हर ओक तसेच बारामतीमधील गोविंदबाग येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.