नवी मुंबई/ठाणे -राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका करणाऱ्या पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Arrested ) चर्चेत आली होती. कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी ( Thane Police ) केतकी चितळेला ताब्यात घेतले आहे. केतकी चितळे सायंकाळी 4.30 वाजल्यापासून कळंबोली पोलिसांच्या ताब्यात असून कळंबोली पोलीस ( Kalamboli Police ) चितळेला ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. दरम्यान, केतकी चितळेवर शाईफेक ( ink Throw on Ketaki Chitale ) करण्यात आली आहे.
ठाणे पोलिसांच्या ताब्यात - ठाणे गुन्हे शाखेचे केतकी चितळेला उशिरा ताब्यात घेतले. यावेळी गुन्हे शाखेच्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडले. नवी मुंबईच्या पोलिसांकडून तिचा ताबा ठाणे गुन्हे शाखेने घेतला.