मुंबई -गेल्या वर्षी करीरोड येथील अविघ्न पार्क ( Avighn Park Fire ) या इमारतीला आग लागली होती या इमारतीला आज पुन्हा एकदा आग लागल्याचे समोर आले आहे दरम्यान या ठिकाणी मुंबई अग्निशमन दल दाखल झाले. अग्निशमन दलाने ( Mumbai Fire Brigade ) इमारतीच्या वरच्या मजल्यावर अडकलेल्या ६० ते ७० जणांची सुटका केली. दुपारी २ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत कोणीही रहिवासी जखमी झाले नाहीत मात्र २ फायरमन आग विझवताना जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
अविघ्न पार्कला आग - मुंबईच्या करी रोड येथील महादेव पालव मार्ग, भारत माता सिनेमा समोरील उत्तुंग अशा अविघ्न पार्क ( Avighn Park Fire ) या इमारती मधील २२ व्या मजल्यावरील एका घरामध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला ( Mumbai Fire Brigade ) सकाळी १०.४५ च्या दरम्यान देण्यात आली. त्यानुसार मुंबई अग्निशमन दल मुंबई पोलीस आणि महापालिका कर्मचारी ( Mumbai Municipal Corporation ) घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लेव्हल वनची असल्याची घोषणा मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आली आहे. आगीच्या ठिकाणी ४ फायर इंजिन आणि ४ वॉटर टँकर यांच्या साहाय्याने दुपारी २ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यानंतर आगीच्या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन करण्यात आले. आग लागलेल्या घरामधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
२ अग्निशमन जवान जखमी - अविघ्न पार्क ( Avighn Park Fire ) या इमारतीत लागलेली आग विजवताना अग्निशमन दलाच्या ( Mumbai Fire Brigade ) जवानांना घरात दरवाजा तोडून घुसावे लागले. हवेमुळे आगीची तीव्रता अधिक होत होती. २२ व्या मजल्यापासून वरच्या मजल्यापर्यंत त्यात आग विजवण्याचे काम करताना धुरामुळे श्र्वसनाचा त्रास होत होता. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. त्यांना केईएम् रुग्णालयात ( KEM Hospital Mumbai ) दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रामदास सनस वय ३७ वर्षे व महेश पाटील वय २६ वर्षे अशी या जवानांची नावे आहेत.