महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांचा खबरीच निघाला अमली पदार्थांचा तस्कर - informer of police

पोलिसांचा खबरी म्हणून काम करणाऱ्या परंतु पोलिसांच्या कारवाईचीच माहिती अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपींना देणाऱ्या खबऱ्याला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटने या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांचा खबरीच निघाला अमली पदार्थांचा तस्कर

By

Published : Nov 13, 2019, 6:57 PM IST

मुंबई - पोलिसांचा खबरी म्हणून काम करणाऱ्या परंतू पोलिसांच्या कारवाईचीच माहिती अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपींना देणाऱ्या खबरी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटने या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. खालीद वशी खान (५१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांचा खबरीच निघाला अमली पदार्थांचा तस्कर

हेही वाचा - सांगलीत १२ तासात दोन खुनाच्या घटना; एक विद्यार्थी तर दुसरा गुंड

अटक केलेल्या आरोपीवर गांजा तस्करी केल्याप्रकरणी या आधीही गुन्हा दाखल आहे. या आरोपीकडून अमली पदार्थ विरोधी पथकाने ४७० ग्रॅम ड्रग्स जप्त केले आहे. जप्त केलेल्या ड्रग्सची बाजारातील किंमत जवळपास १ कोटी रूपयांच्या आसपास आहे. मुंबई पोलिसांचा खबरी असल्याची माहिती आरोपीने दिली असून त्यासंदर्भात अमली पदार्थ विरोधी पथकातर्फे तपास सुरू आहे. सध्या आरोपी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात असून पोलीस या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details