महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nana Patole : पाच राज्यांच्या निवडणुका नंतर महागाईचा भडका होणारच होता - नाना पटोले - नाना पटोले विधानभवन संवाद लेटेस्ट बातमी

सर्वसामान्यांचे प्रश्न भारतीय जनता पक्षाला केवळ निवडणुकीच्या वेळीच दिसतात. त्यामुळे निवडणुकांच्या वेळेमध्ये कोणत्याही वस्तूवर दरवाढ होत नाही. मात्र निवडणूका संपल्या की, लगेच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची तळतळाट केंद्र सरकारला नक्की लागेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी दिला आहे.

नाना पटोले
nana patole

By

Published : Mar 22, 2022, 12:14 PM IST

मुंबई -पाच राज्यांच्या निवडणुका ( Five State Elections ) झाल्यानंतर महागाईचा भडका होईल. या महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना पोहोचेल याचा इशारा निवडणुका होऊन आधीच काँग्रेसने सामान्य नागरिकांना दिला होता. अपेक्षेप्रमाणे केंद्र सरकारनेही आज इंधन आणि घरगुती गॅसच्या दरांमध्ये वाढ करून सामान्य नागरिकांना महागाईचे चटके दिले आहेत.

सर्वसामान्यांचे प्रश्न भारतीय जनता पक्षाला केवळ निवडणुकीच्या वेळीच दिसतात. त्यामुळे निवडणुकांच्या वेळेमध्ये कोणत्याही वस्तूवर दरवाढ होत नाही. मात्र निवडणूका संपल्या की, लगेच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची तळतळाट केंद्र सरकारला नक्की लागेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी दिला आहे. विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

अध्यक्ष निवडीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी -

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने अध्यक्ष निवडीबाबत जो निकाल दिला. तोच निकाल सर्वोच्च न्यायालयात अपेक्षित असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. उच्च न्यायालयात ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांच्या याचिकेचे दहा लाख रुपये जप्त झाले त्यातून भाजपाने काही बोध घेतलेला नाही असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

हेही वाचा -ED Raids Kurla Area : नवाब मलिक प्रकरणात ईडीची कुर्ला परिसरात छापेमारी

काँग्रेस मंत्री आणि नेत्यांची बैठक -

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एचके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस नेते आणि मंत्र्यांची बैठक होणार असून आघाडी सरकारमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम प्रमाणे झालेल्या कामांबाबत या बैठकीत चर्चा होऊन. तसेच सरकारने केलेल्या कामाचा आढावा या बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details