महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uday Samant On Patna Meeting : पाटण्यातील बैठकीवरुन उदय सामंतांनी महाविकास आघाडीला फटकारले - Balasaheb Thackeray

केंद्रातील भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्याच्या उद्देशाने बिहारमधील पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपा विरोधातील पक्षाची बैठक आयोजित केली होती. यात 15 पेक्षा जास्त पक्षाच्या नेत्यांनी सहभाग नोंदविला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची अवस्था अत्यंत बिकट आहे. तिन्ही पक्ष सांभाळू शकत नाही तीच लोक देश जिंकायच्या गोष्टी करतात अशी टीका उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

Uday Samant On Patna Meeting
Uday Samant On Patna Meeting

By

Published : Jun 23, 2023, 9:52 PM IST

उदय सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई :केंद्रातील भाजप सरकार पाडण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली होती. आपल्या कुटुंबातील नेत्यांचे राजकीय भवितव्य सुरक्षित करायचे असल्याने महाराष्ट्रातून गेलेले नेते बैठकीला हजर होते, असा आरोप उदय सामंत यांनी केला आहे. या बैठकीत विविध पक्षाचे १५ हून अधिक नेते सहभागी झाले होते.

महाविकास आघाडीची तारांबळ :महाराष्ट्रातील विरोधी पक्षाची तारांबळ उडाली असून महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांची जागा राष्ट्रवादीने बळकावली आहे. अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपदही सोडायचे आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या प्रदेशाध्यक्षांविरोधात बंड पुकारले आहे. नाना पटोले यांची कधीही हकालपट्टी होऊ शकते अशी, त्याची अवस्था आहे. तिन्ही पक्ष इतके वाईट आहेत की, त्यांना स्वतःचे घर सांभाळता येत नाही, आज तेच लोक देश जिंकण्याच्या गोष्टी करतात. तुम्हाला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणुन नितीश कुमार मान्य आहेत का? असा सवाल देखील उदय सामंत यांनी उपस्थित केला.


फॅमिली पार्टी जास्त :पाटण्यात आज सर्व विरोधी पक्षांमध्ये कुटुंब पक्ष जास्त आहेत. या पक्षांना देशाच्या लोकशाहीपेक्षा आपले कुटुंब वाचवायचे आहे. हे लोक कधीही देशाला आपले कुटुंब मानत नाहीत. त्यांचे सर्व लक्ष त्यांच्या कुटुंबावर असते. महाराष्ट्र सोडून गेलेल्या नेत्यांना आपल्या कुटुंबातील नेत्यांचे राजकीय भवितव्य सुरक्षित करायचे होते म्हणुन ते बैठकीत हजर होते असा हल्लाबोल त्यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.

उद्धव ठाकरे लाचारी :उद्धव ठाकरेंवर टीका : उद्धव ठाकरेंची लाचारी पाहण्यासारखी आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू धर्माची शिकवण देऊन या देशाला राष्ट्रवाद दिला. ज्या लालूप्रसाद यादवांनी बाळासाहेबांची बदनामी केली. त्याच लालूप्रसाद यादवांना पाठिंबा देण्यासाठी आज त्यांचा मुलगा पाटण्याला गेला आहे. त्यांनी हिंदू धर्माला विरोध केला. हिंदुत्वाचा पराभव कसा करायचा हे जाणूनबुजून संघटित केले जात आहे. या सभेत एक हिंदुद्वेषी पक्ष असून त्यांच्या रणधुमाळीने बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली असून त्यांचे पुत्र-नातू पाटण्याला गेले आहेत. हा भारताच्या स्वातंत्र्याचा वैचारिक विश्वासघात आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर, त्यांनी हे पाप उद्धव ठाकरेंना करू दिले नसते.

हिंदुत्व संपवण्याचा कट :आम्ही हिंदुत्व अजिबात सोडले नाही. मात्र, आम्ही पाटण्याला जाऊन हिंदुत्व संपवण्याच्या कटात सहभागी झालो, असे महाराष्ट्रात म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणा जनतेने जाणून घ्यावा. आज महाराष्ट्रात सेना भाजपचे सरकार आहे. आमची विचारधारा एकच आहे. आमचे ध्येय एकच आहे. भारतात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर होणारे अत्याचार बर्‍याच प्रमाणात कमी झाले आहेत. देशभक्त पक्ष हरत आहेत. या देशात वेगळ्या प्रकारची राजकीय क्रांती सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य राहुल गांधी, नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारत नाही. पाटण्यातील हिंदू धर्म संपवण्याच्या कटाचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details