महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sheena Bora Murder Case: शीना बोरा जिवंत आहे? इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांचा दावा

शीना बोरा हत्याकांडात एक नवा ट्वीस्ट आला आहे. (Sheena Bora Murder Case). शीना बोरा ही जिवंत असल्याचा (Sheena Bora is alive) दावा इंद्राणी मुखर्जीचे (Indrani Mukherjee) वकील रणजीत सांगळे यांनी केला आहे. (lawyer Ranjit Sangle).

Sheena Bora Murder Case
शीना बोरा हत्याकांड

By

Published : Nov 3, 2022, 3:32 PM IST

मुंबई:शीना बोरा हत्याकांडात एक नवा ट्वीस्ट आला आहे. (Sheena Bora Murder Case). शीना बोरा ही जिवंत असल्याचा (Sheena Bora is alive) दावा इंद्राणी मुखर्जीचे (Indrani Mukherjee) वकील रणजीत सांगळे यांनी केला आहे. (lawyer Ranjit Sangle). राहुल मुखर्जीचे (Rahul Mukherjee) मोबाईल मधील संभाषण आणि मेसेज यावरून सिद्ध होते की शीना जिवंत आहे, असा दावा इंद्राणीच्या वकिलाने केला आहे. या प्रकरणात महत्वाचा साक्षीदार असलेल्या राहुल मुखर्जी उलट तपासणी दरम्यान अनेक प्रश्नांवर उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे, यामुळे शीना बोरा जिवंत असल्याची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे यांनी केली आहे. याप्रकरणी राहुल मुखर्जीची आज विशेष सीबीआय कोर्टामध्ये उलट तपासणी सुरू आहे.

इंद्राणी मुखर्जी यांच्याबद्दल थोडक्यात - इंद्राणी मुखर्जी या ब्रिटिश माजी एचआर सल्लागार आणि मीडिया एक्झिकेटिव्ह होत्या. आयएनएक्स या मीडिया हाऊसेचे माजी संचालक पीटर मुखर्जी सोबत इंद्राणीने लग्न केले होते. हे तिचे तिसरे लग्न होते. आता त्यांच्या घटस्फोट झाला आहे. 2007 मध्ये तिने पती पीटर मुखर्जी सह INX मीडियाची स्थापना केली होती. या मीडिया हाऊसमध्ये इंद्राणी सीईओच्या भूमिकेत वावरत होती. 2009 मध्ये तिने कंपनीचा राजीनामा दिला आणि नंतर तिने आपला हिस्सा विकला होता. ऑगस्ट 2015 मध्ये, तिला मुंबई पोलिसांनी अटक केली आणि तिची मुलगी शीना बोराच्या कथित हत्येची मुख्य आरोपी म्हणून इंद्राणीची नवी ओळख समोर आली.

काय आहे प्रकरण -इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती. शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणी शिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुल सोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिकवाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details