मुंबई -वाढते प्रदूषण, नैसर्गिक संसाधनाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचे (world environment day) संवर्धन करण्यासाठी रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण येत्या २०२३पर्यंत करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी रेल्वे मिशन मोडमध्ये काम करीत आहे. जगातील सर्वात मोठी हरित भारतीय रेल्वे बनण्यासाठी कार्यरत आहे आणि २०३० पूर्वी “निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक” बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आज 5 जून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा.
राज्यात १८९५ किमीचे विद्युतीकरण -
पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे आवश्यकता आहे. परिणामी देशातील सर्व रेल्वेचे विद्युतीकरण करण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. विद्युतीकरणामुळे गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. २०१४पासून पर्यावरण अनुकूल आणि प्रदूषण कमी करणाऱ्या रेल्वे विद्युतीकरणाचा वेग जवळपास दहा पटीने वाढला आहे. ब्रॉडगेज (बीजी) मार्गांचे शंभर टक्के विद्युतीकरण करण्यासाठी डिसेंबर, २०२३पर्यंत संतुलित ब्रॉडगेज (बीजी) मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. यामुळे डिझेलमुळे होणार प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वेत, २०१४-२१मध्ये एकूण महाराष्ट्रात १ हजार ८९५ ट्रॅक कि.मी., मध्य प्रदेशात १४५ ट्रॅक कि.मी. आणि कर्नाटकात १९३ ट्रॅक कि.मी. अंतराचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. एकूण ५५५ किमी ट्रॅकच्या विद्युतीकरणाचे काम तीन विभागांत सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
२ हजार ३०० कोटी रुपयांची बचत -
भारतीय रेल्वेत हेड ऑन जनरेशन (एचओजी) प्रणालीही आहे. यात लोकोमोटिव्हद्वारे ओव्हर हेड इक्विपमेंटकडून (ओएचई) थेट डब्ब्यांत विद्युत दिली जाते. यामुळे ट्रेनमध्ये वेगळ्या पॉवर कारची गरज कमी होते. परिणामी यामुळे डिझेलचा वापर कमी होऊन वर्षाला 2 हजार 300 कोटी रुपयांची बचत होईल. तर, कार्बन फुटप्रिंट वर्षाला 31 लाख 88 हजार 929 टन कपात होईल. त्यामुळे प्रदूषणात घट होण्यास मदत होईल.
विद्युतीकरणाचे फायदे -