महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्विटरवर रेल्वेची टिव-टिव बंद होणार का? रेल्वेकडून 'कू अ‌ॅपला' पसंती - मेड इन इंडिया मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू अ‌ॅप

कमी आणि नेमक्या शब्दांमध्ये व्यक्त होण्यासाठी ट्विटरचा पर्याय सर्वात उत्तम मानला जातो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. त्यामुळे आता भारतीय रेल्वेतील सर्व विभागीय कार्यालयांनी ट्वीटरप्रमाणेच ‘कू’ नावाच्या देशी सोशल मीडिया अ‌ॅपवर अकाउंट सुरू केले आहे.

Koo App
कु अ‌ॅप

By

Published : Mar 13, 2021, 9:51 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली आहे. तसेच विदेशी वस्तूपेक्षा भारतीय वस्तूचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार भारतीय रेल्वेतील सर्व विभागीय कार्यालयांनी ट्वीटरप्रमाणेच ‘कू’ नावाच्या देशी सोशल मीडिया अ‌ॅपवर अकाउंट सुरू केले आहे. मेड इन इंडिया मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'कू' अ‌ॅपला पसंती मिळत असल्याने आता रेल्वेची ट्विटरची टिवटिव बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारतीय रेल्वेची मेड इन इंडिया मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'कु' अ‌ॅपला पसंती

रेल्वेत देशी सोशल मीडिया -

देशात ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या विदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्येक जण अ‍ॅक्टिव्ह आहे. दररोज प्रत्येक जण आपला बराचसा वेळ सोशल मीडियावर घालवतो. याचबरोबर मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेही सोशल मीडियावर सक्रिय आहे. रेल्वेमधील नवीन मोहिम, उपक्रम, प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रेल्वे सोशल मीडियाचा आधार घेते. भारतीय रेल्वेमध्ये सर्व विभागीय कार्यालयांचे सोशल मीडियावर अकाउंट आहे. मात्र आता, विदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबरोबर मेड इन इंडिया मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म कू अ‌ॅपला पसंती मिळत आहे. या देशी अ‌ॅप युजर्सची संख्या झपाट्याने वाढ असून आता या सोशल मीडियाचा वापर भारतीय रेल्वेकडून सुद्धा करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेचे एका महिन्यात 29 हजार 940 फॉलोअर्स -

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, मेड इन इंडिया मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू अ‌ॅप सर्वांनी इन्स्टॉल करण्याचे तोंडी आदेश मिळालेले आहे. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी आणि रेल्वेच्या सर्व विभागांनी 'कू अ‌ॅप'वर फेब्रुवारी महिन्यापासून अधिकृत खाते उघडले आहेत. गेल्या एका महिन्यात मध्य रेल्वेचे कू अ‌ॅपवर 29 हजार 940 फॉलोवर्स, कोकण रेल्वेला 1 हजार 394 फॉलोवर्स आणि पश्चिम रेल्वेला 1 हजार 23 फॉलोअर्स झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details