महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

21 सप्टेंबरपासून धावणार रेल्वेच्या विशेष 20 क्लोन गाड्या, ही आहे संपूर्ण यादी - क्लोन रेल्वे बातमी

प्रवाशांची मागणी लक्षात घेता भारतीय रेल्वेने क्लोन गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. 21 सप्टेंबरपासून धावणाऱ्या या क्लोन गाड्यांच्या जोड्यांची संख्या आणि वेळसारणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात पूर्व मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि उत्तर रेल्वेच्या सर्व झोनच्या क्लोन गाड्यांचा समावेश आहे.

क्लोन गाड्या
क्लोन गाड्या

By

Published : Sep 16, 2020, 5:13 PM IST

मुंबई :भारतीय रेल्वेच्या 21 सप्टेंबरपासून विशेष मार्गांवर क्लोन गाड्यांच्या 20 जोड्या धावणार आहेत. ही सेवा सध्या कार्यरत असलेल्या लेबर स्पेशल ट्रेन आणि इतर विशेष गाड्यांच्या व्यतिरिक्त असेल. क्लोन केलेल्या गाड्यांसाठी आगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) 10 दिवसांचा असेल, असे रेल्वेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यूपी, बिहार, दिल्ली, पंजाबासह अनेक राज्यांत या क्लोन गाड्या धावतील.

रेल्वे गाड्यांची यादी

प्रवाशांना गाड्यांच्या प्रतीक्षा यादीच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी क्लोन गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर, आता रेल्वेने या 20 जोडलेल्या क्लोन गाड्यांची संख्या आणि वेळसारणी प्रसिद्ध केली आहे. यात पूर्व मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि उत्तर रेल्वेच्या सर्व झोनच्या क्लोन गाड्यांचा समावेश आहे.

क्लोन ट्रेनच्या तिकिटांच्या किंमतींबाबत निवेदनात म्हटले आहे, की क्लोन गाड्यांच्या 20 जोड्यांपैकी 19 पैकी 19 तिकिटांची किंमत हमसफर एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकीट दराइतकी असेल. लखनऊ-दिल्ली मार्गावर धावणाऱ्या क्लोन ट्रेनच्या तिकीटांची किंमत जनशताब्दी एक्स्प्रेसच्या तिकिटाच्या किंमतीनुसार असेल. ज्या ठिकाणी मागणी जास्त आहे किंवा प्रतीक्षा यादी खूप लांब आहे, अशा मार्गावर रेल्वे या क्लोन केलेल्या गाड्या चालवतील. या गाड्या प्रामुख्याने एसी गाड्या असणार आहेत आणि त्या पूर्ण राखीव ठेवल्या जातील, असेही निवेदनात पुढे म्हटले आहे.

रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या गाड्यांची यादी पुढीलप्रमाणे -

  • सहरसा ते नवी दिल्ली - नवी दिल्ली ते सहरसा
  • राजगीर ते नवी दिल्ली - नवी दिल्ली ते राजगीर
  • दरभंगा ते नवी दिल्ली - नवी दिल्ली ते दरभंगा
  • मुझफ्फरपूर ते दिल्ली - दिल्ली ते मुझफ्फरपूर
  • राजेंद्र नगर ते नवी दिल्ली - नवी दिल्ली ते राजेंद्र नगर
  • कटिहार ते दिल्ली - दिल्ली ते कटिहार
  • न्यू जलपाईगुडी ते अमृतसर - अमृतसर ते न्यू जलपाईगुडी
  • जयनगर ते अमृतसर - अमृतसर ते जयनगर
  • वाराणसी ते नवी दिल्ली - नवी दिल्ली ते वाराणसी
  • बलिया ते दिल्ली - दिल्ली ते बलिया
  • लखनऊ ते नवी दिल्ली - नवी दिल्ली ते लखनऊ
  • सिकंदराबाद ते दानापूर - दानापूर ते सिकंदराबाद
  • वास्को ते निजामुद्दीन - निजामुद्दी ते वास्को
  • बंगळुरु ते दानापूर - दानापूर ते बंगळुरु
  • यशवंतपूर ते निजामुद्दीन - निजामुद्दीन ते यशवंतपूर
  • अहमदाबाद ते दरभंगा - दरभंगा ते अहमदाबाद
  • अहमदाबाद ते दिल्ली - दिल्ली ते अहमदाबाद
  • सुरत ते छपरा - छपरा ते सुरत
  • वांद्रे ते अमृतसर - अमृतसर ते वांद्रे (मुंबई)
  • अहमदाबाद ते पटणा - पटणा ते अहमदाबाद

हेही वाचा -सरकारहो... आमचंही ऐका! कोरोनामुळे हताश झालेल्या कलाकार-लोककलाकारांचा एल्गार

ABOUT THE AUTHOR

...view details