मुंबई - भारतीय नौदलाची विनाशिका 'आयएनएस इम्फाळ' या युद्धनौकेचे जलावतरण नौदलप्रमुख अॅडमिरल लांबा यांच्या हस्ते शनिवारी मुंबईतील माझगाव डॉकमध्ये करण्यात आले. यावेळी या विनाशिका युद्धनौकेला अरबी समुद्रात सोडण्यात आले.
'आयएनएस इम्फाळ' युद्धनौकेचे नौदल प्रमुखांच्या हस्ते जलावतरण - माझगाव डॉक
भारतीय नौदलाची विनाशिका 'आयएनएस इम्फाळ' या युद्धनौकेचे जलावतरण शनिवारी मुंबईतील माझगाव डॉकमध्ये करण्यात आले.
आयएनएस इम्फाळ
भारतीय बनावटीची ही युद्धनौका माझगाव डॉकमध्ये 'मेक इन इंडिया'तंर्गत तयार करण्यात आली आहे. 'आयएनएस इम्फाळ' नौदलाच्या १५ बी या प्रकल्पातील तिसरी विनाशिका आहे. त्याचे वजन ३ हजार ३७ टन असून याची लांबी १६३ मीटर तर रुंदी १७ मीटर आहे. ४ गॅस आणि ३० टर्बाइन असलेल्या या विनाशिकेचा ताशी वेग ३० सागरी मैल एवढा आहे.