मुंबई- लॉकडाऊनमुळे बार आणि रेस्टॉरंट व्यवसायाचे आर्थिक नुकसान होत आहे. तेव्हा एफ एल 3 परवाना असलेल्या बार आणि रेस्टॉरंटना घरपोच मद्य विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशनने राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
घरपोच मद्यविक्रीची परवानगी द्यावी, इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनची मागणी - इंडियन हॉटेल & रेस्टॉरंट असोसिएशनची मागणी\
एफएल 3 परवाना असणाऱ्या रेस्टॉरंटना सुविधा देऊन मद्य विक्री होम डिलिव्हरीच्या माध्यमातून आणि किरकोळ विक्री करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून महसूल ही वाढेल आणि कामगारांना रोजगारही मिळेल, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
![घरपोच मद्यविक्रीची परवानगी द्यावी, इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनची मागणी Indian Hotel & Restaurant Association](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7092237-539-7092237-1588815850568.jpg)
लॉकडाऊन असल्यामुळे राज्याला महसूल मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. वाईन्स शॉप खुले ठेवण्याचा निर्णय एकदम योग्य आहे. यामुळे राज्याला महसूलही मिळणार आहे. कामगारांना रोजगार मिळणेही शक्य होणार आहे. मुंबई आणि परिसरात २ हजार ५०० बार आणि रेस्टॉरंट आहेत. तसेच वाईन्स शॉपला परवानगी दिली असली तरी त्यांना गर्दी, तपासणीचे नियोजन करावे लागत आहे. यामुळे त्यांच्यावर भार पडत आहे. यामुळे एफएल 3 परवाना असणाऱ्या रेस्टॉरंटना सुविधा देऊन मद्य विक्री होम डिलिव्हरीच्या माध्यमातून आणि किरकोळ विक्री करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून महसूल ही वाढेल आणि कामगारांना रोजगारही मिळेल, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.