मुंबई :मुंबईत ३ दिवसीय राष्ट्रीय आमदार संमेलन भारत - २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या आज दुसऱ्या दिवशी विविध देशातील आमदारांनी विविध चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला. त्याचबरोबर विचारांचे आदान प्रदानही केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरातील आमदार पहिल्यांदाच एकाच छताखाली आले आहेत. आज दुसऱ्या दिवशी झालेल्या चर्चासत्रामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीसुद्धा सहभाग घेतला.
प्रत्येकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची :फडणवीस म्हणाले की, भारताच्या अमृत काळामधील अशा प्रकारचा मेळावा आणि कार्यक्रम भारताची लोकशाही आणखी मजबूत आणि समृद्ध करेल. असे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या २५ वर्षांना 'अमृत काळ' असे नाव दिले आहे. या अमृत कालात भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर या सभागृहात जमलेल्या प्रत्येकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
भारताला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेणे :देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, आपल्या विचारधारा भिन्न असू शकतात, आपले मार्ग देखील भिन्न असू शकतात परंतु आपले साधन एक आहे. ते साधन लोकशाही आहे. आमचे गंतव्यस्थानही तेच आहे. ते म्हणजे भारताला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेणे. जेव्हा साधन एक असते आणि अंतिम गंतव्य देखील एक असते. तेव्हा आपण सर्वजण आपल्या विचारांसह, त्या साधनाचा वापर करून निश्चितपणे त्या अंतिम गंतव्याकडे वाटचाल करू शकतो, असेही फडणवीस म्हणाले.
लोकशाही मार्गाने सरकार निवडले जाते :फडणवीस पुढे म्हणाले की, अशा प्रकारचे मंच नक्कीच विचार मंथन करू शकतात. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि मजबूत लोकशाही आहे. ही लोकशाही अधिक समृद्ध कशी करता येईल यावर विचारमंथन करावे लागेल. आपल्याकडे १४० कोटी लोकांची एवढी प्रचंड लोकशाही आहे. तरीही आपण भारतात निष्पक्ष निवडणुका घेऊ शकतो. भारतात लोकशाही मार्गाने सरकार निवडले जाते. हा भारताच्या लोकशाहीचा विजय आणि ताकद आहे.
लोकशाही भारतीय जनतेच्या रक्तात :आपली भारतीय संस्कृती पाहिली तर हजारो वर्षांपूर्वी आपण प्रजासत्ताक तसेच लोकशाहीची स्थापना केली होती. ही लोकशाही भारतीय जनतेच्या रक्तात आहे. ते आपल्या भारताच्या मूल्यांमध्ये आहे. त्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊ शकतो. देशाला पुढे नेण्यासाठी आपल्यातील लहानसहान मतभेदांवर नक्कीच मात करू शकतो. आपली राज्यघटना सर्वोत्कृष्ट असल्यामुळे आपली लोकशाहीही सर्वोत्तम आहे. हे इतके अनोखे आहे की एखाद्या व्यक्तीच्या कल्याणासाठी तुम्हाला जे हवे असेल ते ध्येय साध्य करण्याचा मार्ग या संविधानाने तयार केला आहे. हे चेक आणि बॅलन्स देखील प्रदान करते. भूमिका आणि जबाबदाऱ्या यात स्पष्ट फरक आहे. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. असे सांगत, मला खात्री आहे की या एका प्रकारच्या परिषदेतून चांगल्या कल्पना आणि परिणाम समोर येतील, जे भारताच्या ध्येयाकडे एकत्रितपणे वाटचाल करण्यासाठी चांगली अंतर्दृष्टी आणि इनपुट देईल, असेही फडणवीस म्हणाले.
याप्रसंगी देशभरातील आमदारांसहित, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर , लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील-चाकूरकर, डॉ. मीरा कुमारी, सुमित्राताई महाजन, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम ताई गोर्हे, या परिषदेचे आयोजक राहुल कराड, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड हे देखील उपस्थित होते.
हेही वाचा - Devendra Fadnavis Reaction : लोकांच्या मनातून सावरकर काढू शकत नाही, देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल