मुंबई - भारतात दहशतवाद माजवून भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत कुठलेही संबंध ठेवूच नयेत, त्यांच्यासोबत क्रिकेट ही खेळू नये, अशी भूमिका दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. त्या भूमिकेवर आजही शिवसेना कायम आहे. आगामी विश्वचषकातही पाकिस्तानसोबत भारतीय संघाने किक्रेट खेळू नये, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे, ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे.
शिवसेना आजही 'त्या' भूमिकेवर ठाम - रामदास कदम
भारतात दहशतवाद माजवून भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत कुठलेही संबंध ठेवूच नयेत, त्यांच्यासोबत क्रिकेट ही खेळू नये, अशी भूमिका दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती.
पुलवामा दहशतवादी हल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या देशाशी कोणताही संबंध न ठेवता, पाकिस्तानला धडा शिकवावा, असा संताप सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. तसेच पाकिस्तानसोबत क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामनेही खेळू नये, अशी भूमिका नागरिक समाज माध्यमात मांडत आहेत. याची दाखल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही घेतली आहे. यावर बीसीसीआयने समाज माध्यमात भूमिका मांडली आहे. भारत सरकारने पाकविरुद्ध क्रिकेट खेळू नये, असे सांगितल्यास, बीसीसीआय सामन्यांवर बहिष्कार टाकेल. असे बीसीसीआयने म्हटले असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात विविध प्रतिक्रिया येत असून दिवंगत बाळासाहेबांनीच कित्येक वर्षांपूर्वी पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये, अशी भूमिका मांडली असल्याची आठवण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी करून दिली आहे.