मुंबई -INDIA Alliance press conference- स्वायत्त संस्थांचा गैरवापर होत आहे. मणिपूर जळत असतानाही विशेष अधिवेशन बोलाविले नाही. मोदी गरिबांसाठी काम करत नाही. इंडियाचा लढा महागाईविरोधात आहे.चीनकडून भारतात घुसखोरी केली जात असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलीय. खरगे हे पत्रकार परिषदेत बोलत आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, बैठकीला २८ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. देशासमोर अनेक समस्या आहेत. त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या समस्या आहेत. इंडियाच्या बैठकीत शेतकरी, कामगार आणि तरुणांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली आहे. इंडियाच्या पुढील रणनीतीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. देशात भाजपविरोधी नाराजीची भावना आहे. मात्र, भाजपा सरकार लोकांच्या समस्येवर चर्चा करायला तयार नाही. आम्ही थांबणार नाही. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना रोखणार आहोत. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यासाठी चांगले प्रशासन देण्याचे काम सुरू आहे.
चीननं लडाखमधील जमिनीवर अतिक्रमण केलयं-राहुल गांधीृइंडियाच्या समितीची स्थापना हा पहिला निर्णय घेण्यात आलाय. दुसरा निर्णय हा जागावाटपासंदर्भात आहे. जर विरोधी पक्ष एकत्रित आले तर भाजपाला निवडणूक जिंकणे शक्य नाही. उत्तम आयोजनाबद्दल उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे आभारी आहोत. पंतप्रधान हे गरिबांचा पैसा उद्योगपतींच्या घशात घालत आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करणार आहोत, असल्याच राहुल गांधी यांनी सांगितलय. लडाखमधील जमीन चीननं घेतल्याचे तेथील लोकांनी सांगितलयं. पंतप्रधान मोदी खोट बोलत असल्याचं लडाखच्या लोकांनी सांगितलयं. चीननं लडाखमधील जमिनीवर अतिक्रमण केलयं. इंडिया आघाडी ही भाजपाला निवडणुकीत सहज पराभव करेल, असा विश्वास आहे. Rahul Gandhi in INDIA Press conference
आम्ही देशाचा इतिहास बदलू देणार नाही-खरगे-काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे Rahul Gandhi in INDIA Press conference म्हणाले, मोदी गरिबांसाठी कधीही काम करणार नाहीत. ते उद्योगपतींना साथ देतात. अदानी यांची संपत्ती कशी वाढलीय, याबाबत राहुल गांधी यावर बोलले आहेत. उद्योगपती यांच्याकडे गरिबांचा पैसा जातोय, हे रोखण्यासाठी इंडिया काम करणार आहे. केंद्रीय तपास एजन्सीचा गैरवापर केला जातोय. आम्ही मोदी यांच्या विचारधारेच्या विरोधात एकत्र आलो आहोत. सीएजी रिपोर्टमध्ये सगळा घोटाळा समोर आलाय. तिसरी बैठक अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलीय. नियमितपणे वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या बैठका होणार आहेत. देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही देशाचा इतिहास बदलू देणार नाही. सर्वधर्म एकत्र राहून काम करणार आहोत.