मुंबईINDIA Next Alliance Meeting :विरोधी इंडिया आघाडीची पुढील महत्त्वाची बैठक राष्ट्रीय राजधानी दिल्लीत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Sharad Pawar group) खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्या मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक संपल्यानंतर बोलत होत्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना इंडिया आघाडीची पुढील बैठक कुठे होणार असा प्रश्न विच्यारण्यात आला होता.
बैठकीत तब्बल 28 पक्ष सहभागी :भाजपा विरोधात विरोधकांची इंडिया आघाडी चांगलीच तयारी करत असल्याचं दिसून येत आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीत तब्बल 28 पक्ष सहभागी झाले होते. विशेष म्हणजे शुक्रवारी झालेल्या बैठकीत तीन महत्त्वाचं ठराव मंजूर करण्यात आले. या बैठकीत इंडिया आघाडीचा आत्मविश्वास वाढल्याचं देखील दिसून आलं.
- पुढील बैठकीत जागावाटपाची शक्यता :इंडिया आघाडीच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीत जागावाटपाची होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुढील बैठक दिल्लीत होणार असल्याचं स्पष्ट केलंय. याची तारीख विचारली असता, तुम्हाला हव्या असलेल्या तारखेला बैठक ठेऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
समन्वय समिती स्थापन : "इंडिया आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीचा आज समारोप झाला. शिवाय शिवसेनेचे (यूबीटी) गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला असून चार मुख्य समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. 14 सदस्यीय समन्वय समितीमध्ये केसी वेणुगोपाल (INC), शरद पवार (NCP), टीआर बाळू (DMK), हेमंत सोरेन (JMM), संजय राऊत (SS-UBT), तेजस्वी यादव (RJD), अभिषेक बॅनर्जी (टीएमसी), राघव चढ्ढा (आप), जावेद अली खान (एसपी), लालन सिंग (जेडीयू), डी राजा (सीपीआय), ओमर अब्दुल्ला (एनसी), मेहबूबा मुफ्ती (पीडीपी), यांचा समावेश आहे.
निवडणुका एकत्र लढण्याची शक्यता : तत्पूर्वी, भाजपा विरोधी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी शुक्रवारी 2024 ची लोकसभा निवडणूक "शक्य" असल्यास एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय, असं तिसऱ्या बैठकीत घेतलेल्या ठरावात म्हटलं आहे. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशानं विरोधी गट इंडिया आघाडीची तिसरी औपचारिक बैठक पार पडली. संयुक्त विरोधी पक्षाची पहिली बैठक 23 जून रोजी पाटणा इथं, तर दुसरी बैठक 17-18 जुलै रोजी बेंगळुरू इथं झाली होती.
हेही वाचा -
- INDIA Alliance press conference : भाजपा सरकार लोकांच्या समस्येवर चर्चा करायला तयार नाही-शरद पवार
- INDIA Alliance Meeting : इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना
- Sudhir More Dead Body Found In Mumbai : उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; सुधीर मोरे यांची रेल्वेपुढं आत्महत्या?