महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

President Police Medal : महाराष्ट्रातील 'या' 3 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर - स्वातंत्र्य दिन 2023

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे दरवर्षी पोलीस पदके जाहीर केली जातात. यंदा महाराष्ट्रातील एकूण 76 पोलिसांना पदके मिळाली आहेत. यापैकी 3 अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले आहे.

President Police Medal
राष्ट्रपती पोलीस पदक

By

Published : Aug 14, 2023, 8:29 PM IST

मुंबई : महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात. राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलीस अधिकाऱ्यांना विश‍िष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले. यासह राज्यातील 33 पोलिसांना पोलीस शौर्य पदक तर 40 पोलिसांना प्रसंशनीय सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले. अशाप्रकारे राज्यातील एकूण 76 पोलिसांना पदके मिळाली आहेत.

एकूण 954 पोलिसांना पोलीस पदके जाहीर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे दरवर्षी पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदकं जाहीर करण्यात येतात. राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक आणि पोलीस शौर्य पदक हे जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. राष्ट्रपती पोलीस पदक हे पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. तर प्रसंशनीय सेवेसाठी पोलीस पदक हे कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. 2023 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण 954 पोलिसांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली.

या 33 पोलिसांना पोलीस शौर्य पदक जाहीर : विशिष्ट सेवेसाठी जाहीर झालेल्या राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांचा समावेश आहे. राज्यातल्या ज्या 33 पोलिसांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहेत, त्यांची नावे पुढीलप्रमाणे - रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील, भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे, कमलाकर घोडाम, चंद्रकांत उके, महारु कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकुंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार.

या 40 पोलिसांना प्रसंशनीय कामगिरीसाठी पदक जाहीर : त्याचप्रमाणे राज्यातील 40 पोलिसांना प्रसंशनीय कामगिरीसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे - प्रवीणकुमार पडवळ (पोलीस सहआयुक्त, मुंबई शहर, वाहतूक विभाग), विजय पाटील (पोलीस उप महानिरीक्षक, एसीबी, मुंबई), राजेश वाघ, अरुण सावंत, बाळकृष्ण हनपुडे पाटील, अधिकराव पोळ, माया मोरे, आनंद वाघ, संजू जॉन, सुभाष दूधगावकर, तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल काटके, व्यंकटेश पलकुर्ती, वलू लाभाडे, अरुणकुमार सपकाळ, संजय जाधव, उमर शेख, रविकांत कदम, प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, चंद्रकांत साळुंके, दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख हमीद शेख, सुनील नवार, संजय माळी, अंबादास हुलगे, शामराव गडाख, मोहन डोंगरे, नागनाथ फुटाणे, विजय आवकीरकर, भानुदास पवार, अशोक लांडे, भास्कर कदम, गुरुनाथ गोसावी, जगदीश भुजाडे, विजय बाविस्कर, कैलास नागरे आणि महादेव पाटील.

हेही वाचा :

  1. Independence Day 2023 : १८०० विशेष पाहुणे, १२ सेल्फी पॉइंट्स; यंदाचा स्वातंत्र्यदिन कार्यक्रम का आहे खास?
  2. Home Minister Medal 2023 : महाराष्ट्राच्या पदरात एकही उत्कृष्ट तपासाचे गृहमंत्री पदक नाही; वाचा काय आहे कारण...

ABOUT THE AUTHOR

...view details