मुंबईतील नरीमन हाऊस व रेल्वेस्थानकांवर सुरक्षाव्यवस्थेत वाढ - नरीमन हाऊस व रेल्वेस्थानकांवर सुरक्षाव्यवस्थेत वाढ
दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर मुंबईतील नरीमन हाऊससह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
नरीमन हाऊस व रेल्वेस्थानकांवर सुरक्षाव्यवस्थेत वाढ
मुंबई - शुक्रवारी दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या ब्लास्टमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सुरक्षेच्या कारणावरून अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरावर नेहमीच दहशतवादी हल्ले होण्याची दाट शक्यता असल्याने दिल्लीतील प्रकारानंतर मुंबईतील नरीमन हाऊससह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी..