महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Abortion Cases : पालकांनो जागे व्हा! अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताचे प्रमाण वाढले, भायखळ्यात सर्वाधिक प्रकरणे

मुंबईत जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२३ या एक वर्षाच्या काळात अल्पवयीन मुलींमध्ये गर्भपाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्ये १५ ते १९ वयोगटात ३४८ इतके गर्भपात करण्यात आले आहेत. तर भायखळा परिसरात बलात्काराच्या घटनांमधून झालेल्या गर्भपाताची संख्या जास्त आहे. भायखळ्याच्या ३७ गर्भपात करण्यात आले आहे.

By

Published : Mar 11, 2023, 7:01 PM IST

Abortion Cases
गर्भपात

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निशिकांत विभूते माहिती देताना

मुंबई : मुंबईला हादरून टाकणारी बातमी असून मुंबईत अल्पवयीन मुलींमध्ये गर्भपातांच्या घटना वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून प्राप्त माहितीनुसार, मुंबईत जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२३ या एक वर्षाच्या काळात अल्पवयीन मुलींमध्ये गर्भपाताच्या घटना वाढल्या असून १५ ते १९ वयोगटात ३४८ इतके गर्भपात करण्यात आले आहेत. त्यामुळे पालकांनी जागरूक राहून आपल्या मुलींना समजावून घेणे खूप गरजेचे बनले आहे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निशिकांत विभूते यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

जनजागृतीवर भर देण्याची गरज : मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी यावर मत व्यक्त केले आहे. ३४८ या सर्व घटनांमध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी की, १५ वर्षाखालील १७ गर्भपात आहेत. त्यामुळे गर्भपाताकडे आता संवेदनशीलपणे पाहणे आणि त्याविषयी जनजागृतीवर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अल्पवयीन मुलींमध्ये गर्भपात वाढण्याची कारणे अनेक आहेत. त्यातील लैंगिक छळ, अत्याचार, बालविवाह आणि अल्पवयीन मुलींमध्ये लैंगिक असाक्षरता ही प्रमुख कारणे आहेत.

गर्भपात प्रकरणांची संख्या वाढणारी : मानसोपचार तज्ज्ञ असलेले डॉ. निशिकांत विभुते यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, कमी वयामध्ये अबॉर्शन म्हणजेच गर्भपात होण्याची तसेच गर्भपात करून घेण्याची संख्या वाढत चाललेली आहे. ही गोष्ट प्रामुख्याने मुंबईमध्ये दिसून आलेली आहे. हा संशोधन किंवा ही येणारी बातमी खरोखरच चिंताजनक आणि दुःखदायक आहे. तर असे गर्भपात घडू नये म्हणून खबरदारी घेणे, सतर्कता ठेवणे खूप आवश्यक आहे. तर पालकांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे की, ज्यामुळे त्या अशा गोष्टी होणार नाही. पहिली गोष्ट लॅक ऑफ कनेक्शन म्हणजेच पालकांचे कनेक्शन मुलांसोबत मुलांसोबत जुळत नाही. संपर्क कमी होत जातो, मुले काय करत आहेत, कुठे जात आहेत माहिती पडत नाही. त्यावेळेस कनेक्शन तुटलेला आहे.

मुलांसोबत संवाद साधणे गरजेचे : डॉ. निशिकांत विभुते पुढे म्हणाले की, लॅक ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच संवाद कमी होणे. पालकांना मुलांची संवाद साधण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा वेळ तरी मिळाला तरी त्यांच्याशी बोलण्यासाठी ते जास्त इंटरेस्ट घेत नाही किंवा बोलू शकत नाही. त्यांच्यामध्ये एक पद्धतीचा दुरावा निर्माण झालेला असतो. लॅक ऑफ गायडन्स म्हणजेच मुलांच्या अडचणी समजून घेणे, वयामानानुसार हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि त्यामुळे शरीरामध्ये होणारे बदल सोबतच विचारांमध्ये होणारे बदल ह्यांच्या वरती लक्ष देणे आणि त्याबद्दल मुलांना बरोबर मार्गदर्शन करणे खूप आवश्यक असते. मुलांना स्पोर्टची आवश्यकता असते. सपोर्ट म्हणजे ज्या ठिकाणी मुले उदास राहतात, कोणत्या अडचणीत अडकलेले असतात, दुःखामध्ये असतात तर त्यावेळेस मुलांना असे वाटणे आवश्यक आहे की आपल्या पालकांकडे आपण जाऊ शकतो आणि त्यांची मदत आपण घेऊ शकतो. त्यामुळे मुलांमध्ये एक निर्दास्तपणा आणि कॉन्फिडन्स निर्माण होतो, असेही त्यांनी सांगितले.

पालकांनी मुलांचा आधार बनावे : त्यासोबतच मोटिवेशन म्हणजेच प्रोत्साहन. बऱ्याच वेळा पालक मुलांची फक्त टीका करत राहतात आणि प्रोत्साहन कमी देतात. त्या चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यासोबतच बरोबर मूल्य काय आहेत, कोणते मूल्य त्या मुलासाठी लॉन्ग टर्म हेल्पफुल आहेत हे देखील शिकवणे पालकांसाठी आवश्यक आहेत. काही कारणांमुळे अशा गर्भपातासारख्या गोष्टींचे मुले बळी पडलेले असतील तर त्या सिच्युएशनमध्ये देखील पालकांनी आपल्या मुलांच्या कलाने घेतले पाहिजे. त्यांना समजावले पाहिजे, त्यांचा सपोर्ट बनणे आवश्यक आहे. आधार देणे आवश्यक आहे आणि त्यांना हळूहळू त्या अवघड परिस्थितीतून बाहेर आणून चांगला आयुष्य जगण्यासाठी त्यांना शिकवणे. त्यांचे जोपासना करणे खूप आवश्यक आहे. या गोष्टी जर आपण लक्ष देऊन केल्या तर नक्कीच अशा सगळ्या घटना कमी होत जातील, असे डॉ. निशिकांत विभुते यांनी सांगितले.


भायखळ्यात सर्वाधिक गर्भपाताच्या घटना : भायखळा परिसरात बलात्काराच्या घटनांमधून झालेल्या गर्भपाताची संख्या जास्त आहे. भायखळ्याच्या ३७ गर्भपात करण्यात आले आहे. जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२३ या एका वर्षाच्या काळात ५० बलात्काराच्या घटनांमधून झालेल्या गर्भपातांची नोंद आहे. त्यातील १७४ टक्के प्रकरणे ही फक्त भायखळ्यातील आहेत. गर्भपातांमागे बलात्काराच्या घटनांमधून गर्भपात होणे हे प्रमुख कारण आहे.

अशी आहे गर्भपाताची आकडेवारी : एक वर्षाच्या कालावधीत मुंबईत ३४८ अल्पवयीन मुलींच्या गर्भपात झाल्याची नोंद आहे. त्यात १५ ते १९ वयोगटातील ३३१ मुली असून १५ वर्षाखालील एकूण १७ मुली असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा : Aurangabad Crime: धक्कादायक! अवैध गर्भपात केल्यानंतर महिलेची प्रकृती चिंताजनक, फरार डॉक्टर दाम्पत्याचा पोलिसांकडून शोध सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details