मुंबई- मुंबईकरांची दुसरी लाईफलाइन म्हणून ओळख असलेली 'बेस्ट' आर्थिक संकटात आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्टच्या डेपोमधील काही जागा पिझा, बर्गर बनवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना भाडेतत्वावर देऊन बेस्टने आपला महसूल वाढवावा, अशी सुचना शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी केली आहे.
डेपोतील काही जागा भाडेतत्वावर देऊन महसूल वाढवा - सुजाता पाटेकर - बेस्ट बातमी मुंबई
बेस्ट आर्थिक संकटात आहे. बेस्टचे बजेट गेले काही वर्षे तुटीचे सादर केले जात आहे. बेस्टला पालिकेने 2 हजार 100 कोटी रुपयांची मदत केली आहे. बेस्टला आपले उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
हेही वाचा-पाण्याऐवजी प्यायले केमिकल; 'पब्जी'मुळे आणखी एका युवकाचा मृत्यू
बेस्ट आर्थिक संकटात आहे. बेस्टचे बजेट गेले काही वर्षे तुटीचे सादर केले जात आहे. बेस्टला पालिकेने 2 हजार 100 कोटी रुपयांची मदत केली आहे. बेस्टला आपले उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी बेस्टने आपल्या मुंबई डेपोमधील काही जागा पिझा, बर्गर बनवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना भाडेतत्वावर दिल्यास त्यामधून बेस्टला चांगले उत्पन्न मिळू शकते. असे केल्यास बेस्टला पुढील काळात पालिकेकडे आर्थिक मदत मागण्याची गरज भासणार नाही, असे पाटेकर म्हणाल्या.
बेस्टचा 2020-21 चा 2 हजार 250 कोटी तुटीचा अर्थसंकल्प पालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. यावर स्थायी समितीमधील नगरसेवक आपल्या सुचना बेस्टला करत असताना सुजाता पटेकर यांनी ही मागणी केली. बेस्टला पालिकेने 2 हजार 100 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. त्यानंतरही बेस्टने 2 हजार 250 कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर केल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. बेस्टने आपला कारभार सुधारण्याची, बेस्ट बसेस वेळेवर आणि ठरल्या ठिकाणापर्यंत चालवण्याच्या सुचना नगरसेवकांनी केल्या.