मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या एसी लोकलच्या तिकीट दरात आजपासून दरवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी एसी लोकलचे तिकीट प्रथम श्रेणीच्या तिकीट दरांपेक्षा १.२ पटीने आकारले जात होते. आजपासून हे दर १.३ पटीने आकारण्यात येणार आहे.
गेल्या २५ डिसेंबर २०१७ ला पश्चिम उपनगरीय मार्गावर देशातील पहिली एसी लोकल सुरू झाली होती. एसी लोकलचे पहिल्या ६ महिन्यांसाठीचे किमान तिकीट जीएसटीसह ६० रुपये, तर कमाल तिकीट २०५ रुपये ठेवण्यात आले होते. २५ जून २०१८ पासून भाडेवाढ करण्यात येणार होती. मात्र, ६ महिन्यांसाठी भाडेवाढ पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे गेल्या डिसेंबर महिन्यापासून भाडेवाढ होण्याची शक्यता होती. अखेर या एसी लोकलचे १ जूनपासून १.३ पटीने तिकीट दर वाढविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला.