मुंबई -मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवर या आजाराचा प्रसार वाढला ( prevalence of measles increased ) आहे. मुंबईमध्ये गोवरचे १७१ रुग्ण (measles patients ) आढळून आले असून ताप आणि लाल पुरळ असलेले १०७९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. गोवरमुळे आतापर्यंत ७ मुलांचा मृत्यू ( So far 7 children have died due to measles ) झाला आहे. मुंबईमधील गोवंडी, चेंबूर, भायखळा, कुर्ला, मालाड, धारावी, सांताक्रूझ, वडाळा या ८ विभागात गोवरचे रुग्ण सर्वाधिक ( Wadala division has the highest number of measles cases ) असल्याचे समोर आले आहे. विशेष करून मुस्लिम समाजातील रुग्ण अधिक आहेत. या समाजातील लोकांनी आपल्या मुलांना गोवरची लस दिली नसल्याने हा प्रसार वाढला आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने लसीकरणाबाबत जनजागृती सुरु केली आहे. जनजागृतीसाठी उर्दू भाषा बोलणाऱ्या डॉक्टरांचा समावेश केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईमधील हे विभाग गोवरचे हॉटस्पॉट - मुंबईत सप्टेंबर पासून ताप पुरळ आलेले रुग्ण आढळून येत आहेत. यापैकी काही रुग्णांना गोवरचा आजार झाल्याचे समोर आले आहे. मुंबईत ८ विभागातील झोपडपट्ट्यात गोवरचे आतापर्यंत १४२ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण गोवंडीतील आहेत. लक्षणे दिसणा-या ६१ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील पाच रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी एका रुग्णांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २४ वॉर्ड कार्यालयापैकी ८ वॉर्डमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक रुग्ण गोवंडी एम ईस्ट विभागात आढळून आले आहेत. भायखळा ई विभाग येथे ५, गोवंडी शिवाजी नगर एम पूर्व येथे ४४, चेंबूर एम पश्चिम ६, कुर्ला एल येथे २९, मालाड पी नॉर्थ येथे १४, दादर धारावी जी नॉर्थ येथे १२, सांताक्रूझ खार पूर्व एच ईस्ट येथे ११, वडाळा माटुंगा एफ नॉर्थ येथे १२ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमध्ये ज्या विभागात गोवर रुग्णांची संख्या वाढत आहे हे सर्व विभाग मुस्लिम वस्तीचे विभाग म्हणून ओळखले जातात. या विभागात नागरिकांनी आपल्या मुलांना लसीकरण करून घेतलेले नाही. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी घरी गेल्यावर आमची मुले आजारी आहेत, घरी नाहीत बाहेर गेली आहेत अशी विविध कारणे देऊन लास घेण्यास टाळाटाळ केली आहे. लसीकरणाच्या कॅम्पला येऊन लस घेऊ असे सांगूनही ते लसीकरणसाला येत नाहीत. यामुळे लसीकरण केले नसल्याने या विभागात गोवरचा प्रसार वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
मुस्लिम लोकप्रतिनिधींकडून जनजागृती - मुस्लिम रहिवासी वस्त्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये अशिक्षित पणा तसेच अस्वच्छता यामुळे गोवरचा प्रसार वाढत आहे. लसीकरण करून न घेतल्याने प्रसार आणखी वाढत आहे. अशा विभागात लसीकरण आणि जनजागृती करण्यास गेल्यावर आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य मिळत नाही. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या विभागात गोवरचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती आणि लसीकरण महत्वाचे आहे. त्यासाठी पालिकेने उर्दू बोलता येणारे डॉक्टर या विभागात पाठवले आहेत. उर्दूमध्ये नागरिकांशी संपर्क साधून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले जात आहे. मुस्लिम समाजातील लोकप्रतिनिधीना लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांचे सहकार्य मिळाल्यास लसीकरण करणे सोपे होणार असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले.
६१ रुग्ण रुग्णालयात, १ व्हेंटिलेटरवर -जानेवारीपासून आतापर्यंत ० ते ८ महिन्याचे ३३, ९ ते ११ महिने ३३, १ ते ४ वर्ष ६७, ५ ते ९ वर्षे २५, १० ते १४ वर्षे ७, १५ आणि त्यावरील ६ असे एकूण गोवरचे १७१ रुग्ण आढळून आले आहेत. ताप आणि पुरळ आलेले ० ते ८ महिन्याचे १३२, ९ ते ११ महिने १३८, १ ते ४ वर्ष ५६०, ५ ते ९ वर्षे १८७, १० ते १४ वर्षे ५०, १५ आणि त्यावरील १२ असे एकूण १०७९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतील एकूण ६८ मुले विविध रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी ६१ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ६ मुले आयसीयुत आहेत. आयसीयूमध्ये असलेली ५ मुले ऑक्सिजनवर तर १ मुलगा व्हेंटिलेटरवर असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कस्तुरबा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी दिली.
मुंबईत ७ संशयीत मृत्यू - २६ ऑक्टोबर पासून आतापर्यंत मुंबईत ७ मृत्यू झाले आहेत. हे सर्व संशयीत रुग्ण आहेत. त्यामधील कस्तुरबा रुग्णालयात ४, राजावाडी २, आणि १ घरी मृत्यू झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले.