मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहरासह जिल्हा सज्ज झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेत महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसत आहे. तसेच, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्नही केले जात आहेत.
यामध्ये पीडब्ल्यूडी ॲपवर आपले नाव नोंदवल्यावर दिव्यांगांसाठी घरपोच वाहन सेवा, युवकांमध्ये मतदानाबद्दल जागृतीसाठी ठीकठीकाणी फ्लॅश मोबचे आयोजन, अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्याचे उप जिल्हाधिकारी फरोग मुकादम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.