महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुगल मॅपमध्ये मराठी भाषा अंतर्भूत करा; मनसेची मागणी - google map in marathi

गुगल मॅपमध्ये सर्च करताना इंग्रजी, उर्दू, हिंदी, गुजराती, बांग्ला व चार दाक्षिणात्य भाषांचा समावेश आहे. मात्र यात मराठी भाषा अंतर्भूत केली नाही. त्यामुळे गुगल मॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, अशी मागणी पांचाळ यांनी केली.

include-marathi-language
गुगल मॅपमध्ये मराठी भाषा अंतर्भूत करा; मनसेची मागणी

By

Published : Jul 16, 2020, 6:39 AM IST

Updated : Jul 16, 2020, 8:46 AM IST

मुंबई- प्रवास करताना एखादा मार्ग शोधण्यासाठी सर्वाधिक वापर होत असलेल्या गुगल मॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, अशी लेखी मागणी मनसे पदाधिकारी व तनिष्का सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पांचाळ यांनी गुगल व्यवस्थापनाकडे केली आहे.

जगात मराठी भाषा ही सर्वात जास्त बोलणाऱ्या भाषांपैकी असून जगात तिचा 11 वा क्रमांक लागतो. तर भारतात ग्रामीण भागात हिंदी आणि बंगाली भाषेनंतर सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही मराठी आहे. गुगल मॅपमध्ये सर्च करताना इंग्रजी, उर्दू, हिंदी, गुजराती, बांग्ला व चार दाक्षिणात्य भाषांचा समावेश आहे. मात्र यात मराठी भाषा अंतर्भूत केली नाही. त्यामुळे गुगल मॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, अशी मागणी पांचाळ यांनी केली.

गुगल मॅपमध्ये मराठी भाषा अंतर्भूत करा

2011 च्या जनगणनेनुसार देशात हिंदी व बंगालीनंतर जास्त बोलली जाणारी मराठी हीच देशी भाषा आहे. देशात 8 कोटी 30 लाख लोक मराठी बोलतात. मराठी भाषेचा योग्य तो मान राखण्यासाठी तिचा समावेश गूगल मॅप्स मध्ये करावा, यासाठी गुगल मॅपचे कन्ट्री मॅनेजर संजीव गुप्ता यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधल्याच पांचाळ यांनी सांगितले.

Last Updated : Jul 16, 2020, 8:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details