महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय राऊत यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन - भांडूप लसीकरण केंद्र

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर जास्तीत जास्त लसीकरण हाच मार्ग सध्या दिसत आहे. त्यामुळे जागोजागी जास्तीतजास्त लसीकरण केंद्र उभारण्यावर मुंबई महापालिकेकडून भर देण्यात येत आहे.

लसीकरण केंद्राचे उद्घाटन करताना खासदार संजय राऊत
लसीकरण केंद्राचे उद्घाटन करताना खासदार संजय राऊत

By

Published : May 11, 2021, 4:30 PM IST

मुंबईत - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर जास्तीत जास्त लसीकरण हाच मार्ग सध्या दिसत आहे. त्यामुळे जागोजागी जास्तीतजास्त लसीकरण केंद्र उभारण्यावर पालिकेकडून भर देण्यात येत आहे. आज भांडूप येथील बापूसाहेब जुवेकर मार्गावरील महापालिका रुग्णालयात लसीकरण केंद्राचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते लोकापर्ण झाले.

लसीकरण केंद्राचे उद्घाटन करताना खासदार संजय राऊत

लसीकरण केंद्राबाहेर होणाऱ्या गर्दीमुळे मुंबईकर हैराण

लसीच्या तुटवड्यामुळे आणि लसीकरण केंद्राबाहेर होणाऱ्या गर्दीमुळे मुंबईकर हैराण आहे. ही गर्दी कमी कमी करण्यासाठी महापालिका जागोगाजी लसीकरण केंद्र उभरत आहे. दरम्यान लस साठ्याचा तुटवडा निर्माण झालेला असल्यानेर परदेशातून लस मागवता येते का याबाबतही महापालिकेची चाचपणी सुरू आहे. आज येथील भांडूप भागात आणखी एका लसीकरण केंद्राचे उद्घाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालिका अधिकारी व स्थानिक आमदार सुनील राऊत उपस्थित होते. या लसीकरण केंद्रावर आज २०० जणांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. महापालिकेने जास्तीतजास्त लसीकरण केंद्र निर्मितीवर भर दिलेला आहे. हे कांजूर-भांडूप मधील आज उद्घाटन झालेले लसीकरण केंद्र पाचवे केंद्र आहे. या लसीकरण केंद्रावर सर्वांना लस मिळणार आहे.

२२७ केंद्र लसीकरण केंद्र

मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण २२७ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व विभागीय सहायक आयुक्तांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. विभागातील आरोग्य केंद्र (हेल्थ पोस्ट) हे प्रमाण माणून पुरेशी जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी अशी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पालिकेच्या दवाखान्यांसह नजीकच्या खासगी रुग्णालयांनादेखील त्या लसीकरण केंद्रांशी जोडून घेण्यात येणार आहे. यामुळे लसीकरणाचा काही त्रासदायक परिणाम जाणवल्यास उपचार करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा -18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित करण्याचा विचार- राजेश टोपे

ABOUT THE AUTHOR

...view details