मुंबई -मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आणि संविधान प्रास्ताविकेची प्रतिमा उभारण्यात आली आहे. याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आणि संविधान प्रास्ताविकेची प्रतिमा उभारण्यात आली आहे. याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा - मुंबई काँग्रेसच्या निवडणूक छाननी समितीत आजी-माजी अध्यक्षांची उलट तपासणी
या कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योग व खाणकाम मंत्री सुभाष देसाई, सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सहकार मंत्री सुभाष देशमुख, शालेय शिक्षण मंत्री डॉ. आशिष शेलार, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षिरसागर, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, आमदार राज पुरोहित, आमदार प्रकाश गजभिये, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह, सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी प्रधान सचिव श्याम तागडे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवासन, सामाजिक कार्यकर्ते व आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे प्रवीण भोटकर, डॉ.राहुल म्हस्के उपस्थित होते.