मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 6 आमदारांनी गुरुवारी (28 नोव्हेंबर) मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे 3 डिसेंबरच्या आत ठाकरे यांना बहुमत सिद्ध करणे गरजेचे होते. त्यानुसार आज (शनिवारी) महाविकासआघाडीच्या सरकारने विश्वासमत ठराव मांडून बहुमत सिद्ध केले. 169-0 असा ठराव संमत झाला. मात्र, यावेळी चार आमदारांनी आपली तटस्थ भूमिका मांडली आहे.
हेही वाचा -'देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वत्र मंदी, केवळ भाजपच्या वाणीतच तेजी'
भाजपच्यावतीने माजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी संविधानाचा दाखल देत हे सरकार संविधानाची पायमल्ली करून सत्तेवर आल्याचे सांगितले. तसेच यावेळ भाजपच्यावतीने विधानभवनात घोषणा देण्यात आल्या. बहुमत चाचणीपूर्वीच भाजप व त्यांच्या समर्थक पक्षांनी सभात्याग केला. तर मनसे, एमआयएम आणि सीपीआयचे (मार्क्सवादी) आमदार तटस्थ भूमिकेत राहिले.
तटस्थ आमदार -
आमदारांचे नाव | पक्ष | मतदारसंघ |
प्रमोद पाटील | मनसे | कल्याण ग्रामीण |
शहा फारूख अन्वर | एमआयएम | धुळे |
मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक | एमआयएम | मालेगाव |
विनोद निकोले | सीपीआयएम | डहाणू |