मुंबई - शहरातल्या घाटकोपरमधील सिंधवाडी पाटीदार सभागृहात पंतप्रधानांच्या मैं भी चौकीदार कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार किरीट सोमय्या, आमदार राम कदम, प्रकाश मेहता, मनोज कोटक उपस्थित होते.
घाटकोपरमधील सिंधवाडी पाटीदार सभागृहात मैं भी चौकीदार कार्यक्रम संपन्न - मै भी चौकीदार
यावेळी सभागृहात मैं भी चौकीदारच्या टोप्या घातलेल्या लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सभागृहातल्या दोन्ही मजल्यांवर स्क्रिनद्वारे कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले होते.
यावेळी सभागृहात मैं भी चौकीदारच्या टोप्या घातलेल्या लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सभागृहातल्या दोन्ही मजल्यांवर स्क्रिनद्वारे कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले होते.
चौकीदार चोर है.. या काँग्रेसच्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी "मैं भी चौकीदार" कार्यक्रम आज देशभरातल्या ५०० ठिकाणी आणि राज्यातील ५४ ठिकाणी पार पडला. कार्यक्रमासाठी गणवेशधारी सुरक्षारक्षक उपस्थित होते. यावेळी सभागृहात मै भी चौकीदार, चौकीदार चौकन्ना है, भारत माता की जय, फिर एक बार मोदी सरकार, अशा घोषणा दिल्या गेल्या.