मुंबई - शहरातील उत्तर भारतीय संघ सभागृहात पंतप्रधानांच्या मैं भी चौकीदार कार्यक्रमचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शहर भाजप अध्यक्ष आशिष शेलार सहभागी होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत "मैं भी चौकीदार कार्यक्रम" संपन्न - भाजप
चौकीदार चोर है.. या काँग्रेसच्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी "मैं भी चौकीदार कार्यक्रम" आज देशभरातील ५०० ठिकाणी आणि राज्यातील ५४ ठिकाणी पार पडला. कार्यक्रमासाठी गणवेशधारी सुरक्षारक्षक उपस्थित होते.
चौकीदार चोर है.. या काँग्रेसच्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी "मैं भी चौकीदार कार्यक्रम" आज देशभरातील ५०० ठिकाणी आणि राज्यातील ५४ ठिकाणी पार पडला. कार्यक्रमासाठी गणवेशधारी सुरक्षारक्षक उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच कार्यक्रमाची रंगीत तालीम करण्यात आली होती. यावेळी सभागृहात मै भी चौकीदार, चौकीदार चौकन्ना है, भारत माता की जय, फिर एक बार मोदी सरकार... अशा घोषणा दिल्या गेल्या.
जनतेच्या पैशांवर पंजा पडू देणार नाही, असे सांगत चौकीदार एक स्पिरिट आहे. बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक बद्दल बोलतांना ते म्हणाले, बालाकोट हल्ला सैनिकांनी केला. त्या सैनिकांना सलाम. अनेक जन पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहे. मी मात्र नफ्या तोट्याचा विचार न करता निर्णय घेतले. पुढे काय होईळ याबद्दल चिंता केली नाही. यापुढेही अशीच दहशतवादाच्या मुळाशी जाऊन कारवाई करणार. माझ्यासाठी निवडणूक नव्हे तर देशाचे प्राधान्य आहे. आपले विरोधक मात्र पाकिस्तानला मदत करत असल्याचे मोदी म्हणाले.