महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाच वर्षांत ७७ लाख ३३ हजार ९८४ रूपयांनी वाढले उदयनराजेंचे उत्पन्न - UdayanRaje news

भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून आज उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून १ कोटी ५६ लाख रुपयांच्या पाच गाड्या असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. तर मागील पाच वर्षांत ७७ लाख ३३ हजार ९८४ रूपयांनी उत्पन्न वाढले असल्याचे स्पष्ट केले आहे.

In the five years, the revenue of Udayan Raj increased by ७७,३३,९८४
पाच वर्षांत ७७ लाख ३३ हजार ९८४ रूपयांनी वाढले उदयनराजेंचे उत्पन्न

By

Published : Mar 13, 2020, 4:04 AM IST

मुंबई - भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून आज उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून १ कोटी ५६ लाख रुपयांच्या पाच गाड्या असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. तर मागील पाच वर्षांत ७७ लाख ३३ हजार ९८४ रूपयांनी उत्पन्न वाढले असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - कोरोना आणि अर्थव्यवस्थेकडे पंतप्रधान साफ दुर्लक्ष करत आहेत'

त्याच्यांकडे ८ लाख २५ हजार ६९० रोख रक्कम तर पत्नी दमयंतीराजे यांच्याकडे १ लाख ८५ हजार ६९० असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून २ कोटी २५ लाख ८६० इतकी रक्कम दाखविण्यात आली आहे. वाहन आणि व्यक्तीगत असे एकुण १ कोटी ८१ लाख ५५ हजार २२२ रूपयांचे कर्जही दाखविण्यात आले आहे. उदयनराजे यांच्याकडे १३ कोटी ५३ लाख ३३ हजार २१५ रूपयांची तर पत्नी दमयंती राजे यांच्याकडे १ कोटी ६१ लाख ६३ हजार १८७ आणि हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून १ कोटी ३ लाख १९ हजार २६८ रूपयांची जंगम मालमत्ता असल्याचे आपल्या शपथपत्रात नमूद केले आहे. तर स्थावर मालमत्ते स्वरूपात उदयनराजे यांच्याकडे १ कोटी १० लाख २३ लाख ७५ हजार, पत्नी दमयंती राजे यांच्याकडे ७० लाख रूपयांची संपत्ती दाखविण्यात आली आहे. तर, स्वयंसंपादित आणि वारसाप्राप्त अशी एकुण २३ कोटी ३७ लाख ११ हजार ५३८ रूपयांची मालमत्ता आहे.

उदयनराजे यांचे पाचगणी येथील सेंटपीटर स्कूल येथे दहावीपर्यंत आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण झाले हे. उदयनराजे यांनी मागील काही महिन्यात आभासी चलन म्हणून वादात सापडलेल्या बिटकॉनमध्ये दहा लाखांची गुंतवणूक केली असून त्याचे बाजारमुल्य हे चार लाखांपर्यंत असल्याचे नमूद केले आहे. यासोबतच उदयनराजे यांच्याकडे शभंर कोटी रूपयांच्या शेत जमिनी, व्यावसायिक गाळे, बिगर शेत जमिनी, सोने, चांदींचे दागिने असून त्याची मोठी यादी त्यांनी दिली आहे.

यासोबतच, यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहितीही त्यांनी शपथपत्रात दिली असून त्यात मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर लोकं जमवून जमावबंदी आदेशाचा भंग करणे, लोकसेवकाला धाक देणे, शिवीगाळ करणे, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे जाहीरात लावणे, आचारसंहितेचा निवडणूक काळात भंग करणे, बँकेच्या व्यवस्थापकांना मारहाण करणे, दुखापत आणि खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा आणि खुनाचा प्रयत्न, महिलेला अवमानीत करणे, खंडणी आणि त्यासाठी कट रचून खुनाचा प्रयत्न करणे इत्यादी गुन्ह्यांची त्यांच्यावर नोंद असल्याची माहिती दिली आहे. यातील कोणत्याही प्रकरणात त्यांना फौजदारी अपराधासाठी सिद्धदोषी ठरविण्यात आलेले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details