महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात - लोकसभा

पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती १४७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम तारिख २८ मार्च होती. या मुदतीत १४७ पैकी ३१ उमेदवारांनी माघार घेतली.

निवडणूक आयोग

By

Published : Mar 29, 2019, 12:49 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत राज्यातील ७ मतदारसंघात १४७ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली होती. त्यापैकी ३१ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली आहेत. तर ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती १४७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम तारिख २८ मार्च होती. या मुदतीत १४७ पैकी ३१ उमेदवारांनी माघार घेतली.

मतदार संघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या

वर्धा लोकसभा मतदारसंघात १४, रामटेक मतदारसंघात १६, नागपूर मतदारसंघात ३०, भंडारा-गोंदिया मतदारसंघात १४, गडचिरोली- चिमूर मतदारसंघात ५, चंद्रपूर मतदारसंघात १३, यवतमाळ- वाशीम मतदारसंघात २४

दुसऱ्या टप्प्याअंतर्गत २७८ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघात छाननीअंती २७८ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून, आज दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details