मुंबई- येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाकडे दहा-पंधरा आमदार सुद्धा शिल्लक राहणार नाहीत. यामुळे आम्ही या विधानसभा निवडणुकीत 240 चा टप्पा पार करु, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज व्यक्त केला आहे.
येत्या निवडणुकीत 240 चा टप्पा पार करू, गिरीश महाजन यांचा विश्वास - उदयनराजे भोसले
आज काँग्रेस, राष्ट्रवादी मधील 80 आमदारांपैकी 10 ते 15 आमदार फक्त आता त्या पक्षात राहतील, अशी स्थिती बनली आहे. सगळे आमदार, माजी मंत्री आमच्या पक्षात येण्यासाठी उत्सूक आहेत असे गिरीश महाजन म्हणाले.
हेही वाचा-महापालिकेच्या कोल्डमिक्स प्लांटमध्ये १२८ पैकी ८७ जागा रिक्त, उत्पादनावर परिणाम
मलबार येथील शिवनेरी बंगल्यात आज सोमवारी गणपतीचे आगमन झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केले. आमची युती झाल्याच्या नंतर जे चित्र होईल, त्यामध्ये हा आकडा मी स्पष्टपणे सांगू शकेल असेही ते म्हणाले. आज काँग्रेस, राष्ट्रवादी मधील 80 आमदारांपैकी 10 ते 15 आमदार फक्त आता त्या पक्षात राहतील, अशी स्थिती बनली आहे. सगळे आमदार, माजी मंत्री आमच्या पक्षात येण्यासाठी उत्सुक आहेत. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचाही भाजपामध्ये लवकरच प्रवेश होत आहे, तर यापलीकडे ही आणखी काही नावे असून तेही आम्ही जाहीर करणार असल्याचे महाजन म्हणाले.
राज्यात समाधानकारक परिस्थिती आहे. शेवटचा माणूस सुखी रहावा ही बाप्पाकडे प्रार्थना मी केली आहे. मी सरकारचा विघ्नहर्ता नाही तर लहान कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला दिलेली जबाबदारी मी पार पाडतो. येत्या निवडणुकीत आम्ही युती मधेच लढणार आहोत. आमच्या जागा वाटपाचा विषय हा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडेल, आमची युती होईल. त्यामुळे काहीही अडचण येणार नाही. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता राज्यात कोणालाही काँग्रेस-राष्ट्रवादी मध्ये राहायचे नाही, अशी स्थिती बनली आहे. सत्तार हे भाजपाकडे येणार होते, पण सेनेत गेले. सिल्लोडची जागा आमच्याकडे आहे. जागेच्या वाटाघाटी अजून बाकी आहेत. यामध्ये बदल होतील न होतील या बाबत आमचे वरिष्ठ ठरवतील. जागांचा निर्णय उद्धव ठाकरे,आमचे नेते अमित शहा आणि मुख्यमंत्री घेतील, असेही महाजन म्हणाले.