मुंबईNanded Hospital Death : महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारली जात नाही. महाराष्ट्र शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळेच नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयामध्ये मृत्यू झाले होते. नांदेडमध्ये लहान बालकांचा देखील मृत्यू झाला होता. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्वतःहून या बातम्यांची दखल घेत राज्य शासन आणि त्यांचे इतर प्राधिकरण यांना प्रतिवाद केला होता आणि प्रतिज्ञापत्र दाखल करा, असे आदेश दिले होते.
राज्य शासनाचे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभाग यामध्ये देखील अनेक प्रकारचे पद रिक्त असल्याची माहिती व प्रतिज्ञा पत्रामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये एकूण 5569 मंजूर पदे होती. त्यापैकी 3974 अद्यापही भरली गेलेली नाहीत. त्यामुळेच शासकीय रुग्णालयामध्ये जो प्रचंड ताण पडतो. तो ताण झेलण्यासाठी तितकेसे डॉक्टर, नर्सेस, इतर कर्मचारी यांची गरज असल्याचं या प्रतिज्ञा पत्रातून स्पष्ट होतं. - मुक्ता श्रीवास्तव, कार्यकर्त्या