महाराष्ट्र

maharashtra

'महाराष्ट्र महिला अत्याचारात नेमका कुठं आहे, याचा डेटा सर्वांसाठी होणार खुला'

By

Published : Oct 6, 2020, 7:03 PM IST

Updated : Oct 7, 2020, 12:43 AM IST

राज्यातील ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली असून याबाबत लवकरच चांगली बातमी विद्यार्थ्यांना मिळेल, अशी माहिती खासदरा सुप्रिया सुळे यांनी दिली.

सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे

मुंबई -महाराष्ट्र राज्य हे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात नेमके कुठे आहे, येथे अत्याचाराचे प्रमाण किती आहे याची सर्व आकडेवारी माध्यम आणि लोकप्रतिनिधींच्या समोर ठेवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि. 6 ऑक्टोबर) मुंबईत दिली.

सह्याद्री अतिथीगृहावर आज (मंगळवार) राज्यातील महिलांच्या अत्याचारासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील महिला लोकप्रतिनिधी विविध महिला संघटनांचे प्रमुख आणि आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोलताना खासदार सुळे

या बैठकीमध्ये राज्यात मागील वर्षांमध्ये महिलांवर झालेल्या विविध प्रकारच्या अत्याचाराच्या संदर्भातील इत्यंभूत माहिती आणि त्यासाठीचा संपूर्ण डेटा गृह विभागाकडून लोकप्रतिनिधींना देण्यात आला. हा लेखाजोखा माध्यमांसमोर आणि तसेच राज्यातील इतर नागरिकांना पाहता येईल अशा प्रकारे ठेवला जावा, अशी मागणी करण्यात आली. तो डेटा लवकरच सर्वांना पाहता येणार आहे, अशी माहितीही खासदार सुळे यांनी दिली.

सुशांतसिंह प्रकरणाच्या संदर्भात विचारले असता खासदार सुळे म्हणाल्या, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 80 हजार खोटे सोशल अकाऊंट काढण्यात आली. हा एकूणच किळसवाणा आणि एका मोठ्या षडयंत्राचा प्रकार आहे. तर अशा प्रकारचा वापर एखादा राजकीय पक्ष करू शकतो, हे अत्यंत गंभीर असल्याचेही त्या म्हणाल्या.

यासंदर्भात भाजपचे नाव न घेता त्या म्हणाल्या, एखादा पक्ष अशा प्रकारे समाज माध्यमावर खोटे अकाऊंट काढण्यासाठी पाठबळ देतो हेच किळसवाणी आहे. शिवाय एखाद्या विषयी राजकीय मतभेद असू शकतात. त्यांना सत्तेत यायचे असेल किंवा सत्ताधारी पक्षाबद्दल राग असेल. पण, एखाद्या राजकीय पक्षाने किळस यावा अशा प्रकारे हे करणे गंभीर आहे. यातून आपली संस्कृती इतक्या खालच्या स्तरावर गेली आहे, त्यामुळे ही माणुसकीला काळिमा फासणारे असल्याचेही सुळे यांनी सांगितले.

हेही वाचा -'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानात जळगावात आढळले जुन्या आजारांचे रुग्ण

Last Updated : Oct 7, 2020, 12:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details