मुंबई -धारावी येथे लिफ्टमध्ये अडकून चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना अंधेरी येथे घडली. देवराज नाग, असे मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
दुःखद : मुंबईत फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने लहानग्याचा मृत्यू - child died andheri
धारावी येथे लिफ्टमध्ये अडकून चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना अंधेरी येथे घडली. देवराज नाग, असे मुलाचे नाव आहे.
रविवारी (२९ डिसेंबर) सायंकाळी देवराज हा त्याच्या बहिणीसोबत खेळत होता. तो फुगा फुगवत असताना अचानक फुगा फुटला व त्याचा एक तुकडा देवराजच्या घशात गेला. हा प्रकार त्याचे वडील सूरज नाग आणि काका राजाराम नाग यांच्या निदर्शनास आला. त्यांनी देवराजला उपचारासाठी क्रिटीकेअर रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी देवराजला नानावटी रुग्णालयात न्यायला सांगितले. नानावटी रुग्णालयातील डॉक्टरांनी देवराजला मृत घोषित केले.
हेही वाचा -योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात ट्रायडंट हॉटेलबाहेर राष्ट्रवादीचे आक्रमक आंदोलन