महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 2 हजार 352 नवे रुग्ण, 43 मृत्यू - मुंबई कोरोना न्युज

मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मुंबईत आज (गुरूवारी) कोरोनाचे 2352 नवे रुग्ण आढळून आले असून 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

Mumbai corona cases latest news
Mumbai corona cases latest news

By

Published : Oct 1, 2020, 10:42 PM IST

मुंबई - आज मुंबईत कोरोनाच्या नव्या 2352 रुग्णांची नोंद झाली असून 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1410 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मुंबईत आज (गुरूवारी) कोरोनाचे 2352 नवे रुग्ण आढळून आले असून 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 36 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 33 पुरुष तर 10 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 7 हजार 494 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 969 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1410 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 70 हजार 678 वर गेला आहे. सध्या मुंबईत 27 हजार 435 सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 66 दिवस तर सरासरी दर 1.06 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 672 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 10 हजार 372 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 11 लाख 29 हजार 869 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details