मुंबई -मानखुर्द येथे काल रात्री काही तरुणांनी येऊन वाहनांची तोडफोड ( Youth vandalized vehicles in Mankhurd ) करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण शांत करून लोकांना त्यांच्या घरी पाठवले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परीसरात रात्रीच पोलीस बदोबस्त वाढवण्यात आला.
मानखुर्द येथे रविवारी रात्री काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड करत मोठे नुकसान केले. या घटनेमागचे कारण अद्याप समजलेले नाही. पण, सध्या इथली परस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आम्ही चौकशी करत आहोत आणि दोषींना लवकरच अटक करू, अशी माहिती पोलीस निरीक्षक महादेव कोळी यांनी दिली.