मुंबई -कांद्याची दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालून साठा करण्यावरही मर्यादा आणली आहे. परिणामी कांद्याची बाजारातील आवक वाढू लागली आहे. त्यामुळे बाजारातील कांद्याचे भाव देखील घसरले आहेत.
कांदा निर्यात बंदीमुळे मुंबईत कांद्याची आवक वाढली हेही वाचा - 'सत्ताधाऱ्यांनीही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी'
दादरच्या घाऊक बाजारात आता कांद्याचे भाव ३५ ते ३८ रुपये आहेत. किरकोळ बाजारात ४० ते ४५ रूपये कांद्याचे भाव आहेत. कांद्याचा तुटवडा होता त्यावेळी घाऊक बाजारात कांदा ४० ते ४५ रुपये आणि किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये होता. दोन महिन्यांपासून डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचे भाव मुंबई घाऊक बाजारात १५ ते १७ रुपयांवर घसरलेले पाहायला मिळत आहेत. कांद्याचे भाव घसरल्यामुळे दादर बाजारांमध्ये ग्राहकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दरघसरण सुरू झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
साठवलेला कांदा पावसामुळे भिजला. हा भिजलेला कांदा बाजारात येत होता. त्याची आवक घटल्याने ऑगस्टपासून कांद्याचे दर वाढत होते. ऑगस्टच्या सुरुवातीला कांद्याचे घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर १० ते १५ रुपये होते. महिना अखेरपर्यंत २२ ते २८ रुपयांवर पोहोचले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ते ४० ते ४५ रुपयांवर पोहोचले होते. त्यामुळे ते सामांन्याच्या आवाक्याबाहेर गेले होते. आता कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकाचे प्रतिसाद चांगल्याप्रकारे मिळत आहे, अशी माहिती तुषार सणस या व्यापाऱ्याने दिली.
हेही वाचा - सणासुदीला बँका देशभरातील २५० जिल्ह्यात भरविणार 'कर्ज मेळावे'